Maratha Reservation : जालन्यात लाठीचार्ज अन् गोळीबार कोणी केला? आदित्य ठाकरेंचा सवाल
जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज आणि गोळीबार कोणी केला? असा सवाल उपस्थित करीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
मोदींच्या सभेला गर्दी गोळा करण्याची सक्ती का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन आलेलं नाही. जालन्यातील अंतरवली सराटीत आंदोलकांवर लाठीजार्च आणि गोळीबाराचे आदेश कोणी दिले होते, याबाबत अद्यापही स्पष्ट झालेलं नसल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.
Israel Hamas War : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात; इस्त्राईलच्या राष्ट्रध्वजाचे…
तसेच जनरल डायर कोण आहेत याचं उत्तर आलेले नाही? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारकडून नुसते आश्वासन दिले जात आहे, कुठलंही ठोस पाऊले उचलली जात नसल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
‘EWSचं नवीन पिल्लू आणलं पण मराठ्यांच्या नादाला लागू नका’; जाहिरातीवरुन जरांगे भडकले!
शिंदे गटावर टीकास्त्र :
गट गद्दारांचा असतो, आमचा पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून दंगली भडकावण्याचं काम सुरु आहे. राज्यातलं सरकार हे घटनाबाह्य असून दोन जातीजातींमध्ये धर्मांमध्ये भांडणे लावण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे.
तिकिट वाटपावरुन भाजप कार्यालयात राडा, केंद्रीय मंत्र्यांना धक्काबुक्की
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही वाद निर्माण करुन लोकांना व्यस्त ठेवत आहे. आता मात्र, जनता त्यांना दारं दाखवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Sanjay Raut : 2024 आधी काय होणार? राऊतांना मोठ्या षडयंत्राचा संशय
दरम्यान, आमचा पक्ष आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे असून उद्या शिवतीर्थावर शिवसेनेचं दसरा मेळावा आहे. या मेळाव्याची सध्या जोरदार, जय्यत तयारी सुरु असून राज्यातून लोक येणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.