सांगली जिंकण्यासाठी अजितदादांनी तोफगोळा जमविला ! जयंत पाटलांना जेरीस आणणार

Ajit Pawar vs Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील ( Jayant Patil) यांच्यातील सुप्त संघर्ष कधीही लपून राहिलेला आहे. कधी निधी, तर कधी मंत्रिपदावर दोघांमध्ये वाद उफाळून येतं. दोघांमध्ये थेट शरद पवारांना मध्यस्थी करावी लागत होती. पक्ष फुटीनंतरही दोघांमधील राजकीय संघर्ष हा सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पराभूत करण्यासाठी अजितदादांनी विडा उचलला होता. तगडा उमेदवारही दिला होता. जयंत पाटलांचे मताधिक्य घटवून अजितदादांनी काहीसा धक्का दिलाय. परंतु जयंत पाटलांना ते पराभूत करू शकले नाहीत. सांगलीतील दोनपैकी एकही जागा जिंकू न शकल्याचे शल्य अजिदादांच्या मनात आहे. विधानसभेचे उट्टे काढण्यासाठी अजितदादांनी आणखी रणनिती आखली आहे. अजितदादांनी सांगलीत कशी ताकद वाढविली आहे. ते जयंत पाटलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धक्के देऊन सांगली जिंकतील का हेच जाणून घेऊया…
तू अशा स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभा आहेस…, अर्जुन कपूरने 26 वर्षीय अर्जुनसाठी लिहिली एक भावनिक चिठ्ठी
लोकसभा निवडणुकीत सांगलीमधून महाविकास आघाडीत फुट पडते काय अशी परिस्थिती होती. कारण काँग्रेसला मानणारे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांच्या मदतीने दिल्लीत गेले. त्यांनी भाजपचे दोन टर्म खासदार संजयकाका पाटील यांचा 1 लाख 1 हजार मतांच्या फरकाने पराभूत केले. तर महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार महाराष्ट्र केसरीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्याला अवघे 60 हजार मते मिळाली होती. त्यावेळी जयंत पाटील यांचा विशाल पाटील यांना उमेदवार देण्याचा विरोध होता, अशी राजकीय चर्चा होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून तीस वर्षांपासून निवडून येणाऱ्या जयंत पाटील यांच्याविरोधात अजितदादांनी माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना मैदानात उतरवले होते. त्यात निशिकांत भोसले यांनी जयंत पाटील यांना घाम फोडला होता. परंतु पाटील हे चौदा हजारांहून अधिक मतांनी निवडून आले. परंतु मताधिक्य कमालीचे घटले होते. हा जयंत पाटलांसाठी धक्काच होता. तिकडे तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघात आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटीलविरोधात भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना पक्षात घेऊन अजितदादांनी तिकीट दिली. परंतु अजितदादांचा डाव रोहित पाटील यांना उधळून लावत विजय मिळविला. सांगलीत महायुतीचे पाच आमदार आहेत. तर महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत.
शेअर बाजारात ४ वर्षांतील सर्वात मोठी एकाच दिवशीची तेजी; सेन्सेक्स ३००० अंकांनी वाढला अन्…
अजितदादांना विधानसभेला यश मिळाले नाही. परंतु सांगलीत आपली ताकद वाढविण्यासाठी अजितदादांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. कवठेमहांकाळाचे माजी मंत्री अजित घोरपडे यांना यापूर्वीच अजितदादांना पक्षात घेतले आहे. आता शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना अजितदादांनी आपल्याबरोबर घेतले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील माजी मंत्री राहिलेले माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांचा प्रचार केला होता. जतेचे माजी आमदार विलासराव जगताप हे भाजपत होते. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांना पडळकर यांचे काम न करता त्यांनी बंडखोर उमेदवार रवी पाटील यांचा प्रचार केला. यामुळे त्यांना पक्षातून काढले. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र देशमुख हे शरदचंद्र पवार पक्षात होते. मात्र विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यांना 13 हजार 958 मते मिळाली होती.
सांगलीत अजितदादांचा एकही आमदार नाही. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली ताकद राहण्यासाठी अजितदादांनी माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगराध्यक्ष यांना बरोबर घेऊन मोट बांधलीय.
येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सांगली महापालिका, मिरज-कुपवाड महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका ताब्यात घेण्याचे अजितदादांचे मनसुबे आहेत. त्यात रोहित पाटील आणि जयंत पाटील यांचे स्थानिक बालेकिल्ला आपल्या ताब्यात आले तरी तेथे निधी देऊन भविष्यात राजकीय पायाभरणी अजितदादा करलीत. परंतु भाजपचे या जिल्ह्यात चार आमदार आहे. शिंदे गटाचा एक आमदार आहे. या परिस्थितीत अजितदादा कसे रोहित पाटील आणि जयंत पाटलांना राजकीय सुरुंग लावतात हे आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीत दिसणार हे नक्की. परंतु जयंत पाटील हे राजकारणात कसेलेले आणि शरद पवारांकडून राजकीय धडे घेणार आहेत. त्यामुळे तेही अजितदादांना सांगलीत सहजासहजी जम बसू देणार नाही.