‘ते’ मंत्रीच करत नाहीत, मग तुम्ही कशाचा त्याग करता? दानवेंचा बच्चू कडूंना खोचक सवाल

‘ते’ मंत्रीच करत नाहीत, मग तुम्ही कशाचा त्याग करता? दानवेंचा बच्चू कडूंना खोचक सवाल

Ambadas Danve on Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, अजूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा काही सुटेना. त्यामुळे सरकारमधील शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी तर थेट आपण मंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केल. यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बच्चू कडू यांना जोरदार टोला लगावला. (Ambadas Danve on Bachchu Kadu what do you sacrifice)

आपण मंत्रीपदाच्या शर्यतीत नसून मंत्रीपदाचा त्याग केल्याचं बच्चू कडू यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर अंबादास दानवे म्हणाले की, ते अर्थात शिंदे सरकार तुम्हाला मंत्रीपद देतच नाहीच, तर मग तुम्ही कशाचा त्याग करताय? तसेच ते काय मंत्रिपदासाठी तुमच्या मागे फिरत आहेत का? ते त्यांच्याच लोकांना मंत्रीपद देऊ शकत नाहीत, मग ते तुम्हाला मंत्रीपद कुठून देणार, अशी टीकाही दानवे यांनी केली.

Double iSmart: ‘लाइगर’ नंतर पुरी जगन्नाथ घेऊन आले; आयस्मार्ट शंकरचा सिक्वल, मुंबईत शूटिंग सुरू… 

आज-उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे रोज बोलल्या जात आहे. आधी खाते वाटप केले पाहिजे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे आपल्याला वाटत नाही, असंही दानवे म्हणाले. त्याचवेळी दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे सोबतच्या लोकांना न्याय देऊ शकत नाहीत, तर अपक्ष आणि इतरांना न्याय देणे तर दूरची गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं.

पत्रकार परिषद घेत कडू यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले होते. यावरही दानवेंनी भाष्य केलं. बच्चू कडू यांचे नेमके गॉडफादर कोण? तेच आम्हाला कळत नाही. आधी म्हणतात की, उद्धव ठाकरेंनी शब्द दिल्यानं मी राज्यमंत्री झालो. त्यानंतर म्हणतात फडणवीस यांनी फोन केला म्हणून मी गुवाहाटीला गेलो. आता म्हणतात, 18 तारखेला मुख्यमंत्र्यांनी मला बोलावलं. त्यांच्या मनात आणि डोक्यात काय चाललंय, तेच कळत नाही. त्यांचा गॉडफादर कोण, हे त्यांनी एकदा ठरवावं, असं दानवे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
शिंदे गटासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मंत्रिमंडळाचा तिसऱ्यांदा विस्तार झाला. मात्र त्यातही बच्चू यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला नाही. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराताच्या धावपळीत कडू यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेत आपण यासाठी आग्रही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले आणि त्यांचा गुलाम म्हणून काम करणार अशी अजब घोषणा केली. यावेळी त्यांनी मंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube