घड्याळ बंद पडले की काय? अमोल कोल्हेंचा अजितदादा गटाला खोचक टोला

घड्याळ बंद पडले की काय? अमोल कोल्हेंचा अजितदादा गटाला खोचक टोला

Amol Kolhe : दोन दिवसांपूर्वी बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रितेक शरद पवाराचं (Sharad Pawar) नाव नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर आता मंजर येथे शासकीय बांधकामांचे उद्घाटन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हस्ते आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थित होते. मात्र, या पत्रिकेत वेळच नमूद केलेली नसल्यानं खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) अजित पवार गटाला टोला लगावला.

Aseem Sarode यांचे शिंदे गटावर धक्कादायक आरोप; गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न… 

बारामतीतील कार्यक्रमातून अजित पवार यांनी जनतेला विकासाच्या मुद्द्यावर साथ द्यावी, असे आवाहन केले. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. आता पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पोलीस ठाण्याच्या इमारतीचे आणि पोलीस निवासस्थानाचे भूमिपूजन होत आहे. यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली. या पत्रिकेत खासदार अमोल कोल्हेंचही नाव आहे. याशिवया, या पत्रिकते प्रमुख पाहुणे, स्थळ, उद्घाटन समारंभ आणि विनीत असा मजकूर आहे. मात्र, या निमंत्रण पत्रिकेवर वेळच दिसू येत नाही. हाच धागा पकडून खासदार कोल्हे यांनी अजित पवार गटाला खोचक सवाल केला.

मोठी बातमी : खासदार,आमदारांची खैर नाही; लाच घेऊन मतदान अन् भाषण करणाऱ्यांवर चालणार खटला 

आता खासदार कोल्हे यांनी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शेअर केली. त्यांनी लिहिलं की, निमंत्रण मिळाले परंतु, निमंत्रण पत्रिकेत वेळच लिहिली नाही, घड्याळ बंद पडले की, काय? असा खोचक टोला लगावला.

या उद्घाटन निमंत्रण पत्रिकेत अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यामुळं अमोल कोल्हेंनी दोन्ही नेत्यांना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोमना मारला. त्यानी पुढं लिहिलं की, असो… पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे… स्वागत तुतारी वाजवून करायला विसरू करा… अशी खोचक टीका केलीय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यांतर खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत राहणं पसंत केलं. ते सातत्यानं अजित पवारांकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देतात. दरम्यान, आता कोल्हेंनी केलेल्या टीकेला अजित पवार गट काय प्रत्युत्तर देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube