माझ्या नेतृत्वात 82 जागा निवडून आल्या अन् पटोलेंनी 82 च्या 16 केल्या; चव्हाणांचा टोला
Ashok Chavhan on Nana Patole: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव करत महायुतीने (Mahayuti) पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या (Mahayuti) या लाटेत मविआसह कॉंग्रेसचा धुव्वा उडाला. काँग्रेसला (Congress) केवळ 16 जागांवर समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर आता भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काँग्रेसवर (Congress) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे नाराज? उदय सामंतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…
मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना 82 जागा निवडून आल्या, माझ्यानंतर पृथ्वीराबाबांनी 82 च्या 42 जागा केल्या. आता नाना पटोलेंनी 16 वरच आणल्या आहेत, असा टोला चव्हाण यांनी लगावाला.
विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया निवडून आल्या आहेत. मुलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साईबाबांच्या आशीर्वादाने माझी मुलगी विधानसभा निवडणुकीत चांगल्या मतांनी निवडून आली. त्यामुळं बाबांच्या चरणी माथा टेकवण्यासाठी आलो असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
दोन डिसेंबरला होणार शपथविधी, मंत्रिमंडळात ‘या’ 33 चेहऱ्यांना मिळणार संधी…
यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पक्षाची अशी दयनीय अवस्था का झाली? याचे काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करावे. मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा निवडून आल्या, पृथ्वीराजबाबा आले, त्यांनी 82 च्या 42 जागा केल्या आणि आता नाना पटोले यांनी 42 वरून 16 वरच आणल्या, असा टोला चव्हाण यांनी लगावला. पुढं ते म्हणाले की, कॉंग्रेसने एकंदरीत जी परिस्थिती आहे, त्याचं आकलन करावे, आत्मपरिक्षण करून निर्णय घ्यावा. पक्षात जुने जानते नेते आणि लोकप्रिय नेते आहेत, असंही चव्हाण म्हणाल.
मी 14 वर्ष वनवास भोगला…
अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्या भाजप प्रवेशावर बोलताना ते म्हणाले, मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. ज्या प्रकारे मी काँग्रेसमध्ये 14 वर्षांचा वनवास भोगला, त्यामुळे मला माझ्या भावना व्यक्त कराव्या लागल्या. पण मला कोणाबद्दल वैयक्तिक आकस नाही. रागाच्या भरात काही बोललो असेल तर ते मनावर घेऊ नये, असंही चव्हाण म्हणाले.
पटोलेंचे संघाशी संबंध – बंटी शेळके
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा आरोपही बंटी शेळके यांनी केला. ते म्हणाले, मी टिळक भवनासमोर उभा राहून सांगतोय की, नाना पटोले यांचे आजही संघाशी संबंध हेत. प्रियांका गांधी माझ्या मतदारसंघात आल्या असतानाही काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे आले नाहीत. प्रियांका गांधी फक्त शेळकेसाठी प्रचार करायला आल्या नव्हत्या. त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. पण माझ्यासाठी कॉंग्रेसची संघटना प्रचारात उतरली नाही, असं शेळके म्हणाले.