‘न्यायालयाचा पेपर फुटल्याचं पहिल्यांदाच पाहिलं’; कडुंनी राणांना जात प्रमाणपत्राच्या निकालावरुनही सोडलं नाही

‘न्यायालयाचा पेपर फुटल्याचं पहिल्यांदाच पाहिलं’; कडुंनी राणांना जात प्रमाणपत्राच्या निकालावरुनही सोडलं नाही

Bachhu Kadu On Navneet Rana : ‘न्यायालयाचा पेपर फुटल्याचं पहिल्यांदाच पाहिलं, असल्याचं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुनही सोडलं नाही. दरम्यान, जाहीर सभा घेण्यावरुन काल अमरावतीत मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. कालच्या राड्यानंतर आज प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर सडकून टीका केली आहे.

‘संविधान गरीबांचं हत्यार अन् मोदी तेच संपवायला निघालेत’; गांधींनी मोदींची स्ट्रॅटेजीच समजावून सांगितली

बच्चू कडू म्हणाले, जात प्रमाणपत्राप्रकरणी उच्च न्यायालयाकडून नवनीत राणा दिलासा देण्यात आला आहे. त्याचं जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलं आहे. न्यायालयाचा निकाल येण्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट निकालच सांगितला होता. नवनीत राणांच्या बाजूनेच निकाल लागणार असल्याचं बावनकुळेनी स्पष्ट केलं होतं. दहावीचा पेपरबद्दल ऐकलं होतं पण न्यायालयाचा पेपर फुटल्याचं आम्ही पहिल्यांदाच ऐकलं असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

Horoscope Today : आजचे राशीभविष्य! ‘या’ व्यक्तींनी चर्चा करताना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे

कालच्या प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटणार :
23 तारखेला निवडणूक आयोगाकडे आमचा कार्यकर्ता गेला होता. राणा यांचा मंडप काढण्याबाबत त्याने निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र, हे मैदान देता येणार नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. आम्हाला जाहीर सभा घेण्याबाबतची परवानगी देण्यात आलेली होती. मात्र ऐनवेळी परवानगी नाकारुन भाजपच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. हे लोकं कायदा तोडणारे आहेत. राणा भाजपची संस्कृती विसरले आहेत. कालच्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान, 23 आणि 24 एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडू हे आपले उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते. त्यासाठी रितसर निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत कडू यांची सभा रद्द करत तेथे अमित शाह यांच्या सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी पोलिसांसमोरच आंदोलन पुकारलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube