‘संविधान गरीबांचं हत्यार अन् मोदी तेच संपवायला निघालेत’; गांधींनी मोदींची स्ट्रॅटेजीच समजावून सांगितली

‘संविधान गरीबांचं हत्यार अन् मोदी तेच संपवायला निघालेत’; गांधींनी मोदींची स्ट्रॅटेजीच समजावून सांगितली

Rahul Gandhi On Pm Narendra Modi : संविधान हे गरिबांचं हत्यार असून मोदी तेच संपवायला निघाले असल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Pm Narendra Modi) स्ट्रॅटेजीच समजावून सांगितली आहे. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपसह मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

सायलेंट व्होटर्सच्या काळजाला हात… मंगळसूत्र अन् संपत्तीवर बोलून मोदींनी निवडणूक फिरवली?

राहुल गांधी म्हणाले, दिल्लीत सरकार फक्त 90 अधिकारी चालवतात. हेच अधिकारी देशाचं बजेट ठरवत असतात. देशातील विविध खात्यांना किती पैसा द्यायचा हे याच अधिकाऱ्यांच्या हातात असतं. मोदींनी हे काम या अधिकाऱ्यांवर सोपवलं आहे. या 90 अधिकाऱ्यांमध्ये फक्त 1 आदिवासी, 3 दलित आणि 3 ओबीसी बांधवाचा समावेश आहे. ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

Sachin Tendulkar : सचिनचे 5 महारेकॉर्ड अजूनही अभेद्य; फक्त ‘या’ दोन खेळाडूंनी दिलीय टक्कर

तसेच देशाचं संपूर्ण बजेट पाहिलं तर भारत सरकार 100 रुपये खर्च करीत असेल तर 100 मधील 6 रुपये 99 पैशांचा निर्णय 90 अधिकाऱ्यांपैकी हे दलित अधिकारी घेत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमचा एवढाच सहभाग आहे का? तुम्हाला तुमची ताकद समजू नये म्हणून मोदी संविधान बदलणार आहेत. ती ताकद तुम्हाला समजली तर संविधानातून तुमची वेगळी ताकद तयार होईल. संविधान हे गरीबांच हत्यार आहे. या हत्याराला 22 ते 25 लोकं मिळून चालवत असून मोदी हेच हत्यार संपवालयला निघाले असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरेही कोट्याधीश; चार वर्षांत भरघोस संपत्ती वाढली!

इंडिया आघाडीचं सरकार आल्यास जातिनिहाय जनगणना करणार
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेचं लक्ष विचलित करीत आहेत. कधी पाकिस्तान, तर कधी चायनाबाबत ते बोलत असतात. देशात काही दिवसांपूर्वीच राम मंदिर आणि संसदेचं उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना जाऊ दिलं नाही. भाजप आदिवासींना वनवासी म्हणत आहे, पण आदिवसाी वनवासी नाहीतर देशाचे पहिले मालक आहेत. इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आधी जातिनिहाय जनगणना करुन दुध का दुध आणि पाणी का पाणी करणार असल्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी जनतेला दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube