‘काम करणारा भाऊ पाहिजे की, चुxxx बनवणारी…’; गोगावलेंचे उबाठाच्या महिला नेत्याविषयी वादग्रस्त विधान

  • Written By: Published:
‘काम करणारा भाऊ पाहिजे की, चुxxx बनवणारी…’; गोगावलेंचे उबाठाच्या महिला नेत्याविषयी वादग्रस्त विधान

Bharat Gogawale on Snehal Jagtap : शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगतापांबद्दल (Snehal Jagtap) बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. काम करणारा भाऊ पाहिजे की… चुXXX बनवणारी बहिण पाहिजे हे लक्षात ठेवा, असं वक्तव्य गोगावलेंनी जगताप याचं नाव न घेता केली. भरत गोगावले यांचं भरभाषणातील हे वादग्रस्त वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहेत.

… तर पुन्हा करता येणार नाही फलंदाजी, बीसीसीआयने बदलले क्रिकेटचे 4 नियम 

रायगमधील एका कार्यक्रमात बोलत असतांना गोगावले यांची जीभ घसरली. ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यावर बोलत असतांना त्यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. ते म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले किंवा आम्ही केलेली काही थोडीफार मदत आणि प्रत्येक गावाचा विकास… मग सांगा तुम्हाला कोण पाहिजे? असं वक्तव्य करत गोगावलेंनी सवाल उपस्थित सवाल केला. पुढे भरत गोगावले असंही म्हणाले की, तुम्हाला कोण पाहिजे? काम करणारा भाऊ पाहिजे की… चुXXX बनवणारी बहिण पाहिजे हे लक्षात ठेवा, असं गोगावले म्हणाले.

‘निर्णय बदला नाहीतर बंडखोरी परवडणार नाही’; अप्पासाहेब जगदाळेंचा थेट पवारांना इशारा 

दरम्यान, त्यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोगावलेंच्या वक्तव्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येऊ शकतात. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी गोगावलेंचा चांगलाच समाचार घेतला.

आदित्य ठाकरेंची टीका…
भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षात एक नेता महिलांबाबत असं वक्तव्य करतोय, आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत जराही लाज वाटत नाही, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना भरत गोगवाले यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, त्यांचे चारित्र्य बघता भरत गोगावले यांची जीभ सातत्याने घसरत असते. त्यांच्या काखेतला रुमाल घसरत नाही. पण, जीभ मात्र घसरते. मुख्यमंत्र्याना याबाबत लाज वाटत नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube