नॅपकीन कुठे ठेवायचा, कसा घ्यायचा?… ट्रेनिंग देऊ, तटकरेंच्या नक्कलवर मंत्री भरत गोगावलेंचा पलटवार

नॅपकीन कुठे ठेवायचा, कसा घ्यायचा?… ट्रेनिंग देऊ, तटकरेंच्या नक्कलवर मंत्री भरत गोगावलेंचा पलटवार

Bharat Gogavle Reply To Sunil Tatkare : खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मंत्री भरत गोगावले यांच्यामधील (Bharat Gogavle) राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. नुकतीच महडमध्ये सुनील तटकरे यांची सभा पार पडली. या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी हुबेहूब भरत गोगावले यांची नक्कल केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर मंत्री भरत गोगावले यांनी पलटवार केलाय. आम्ही पाऊस संपल्यानंतर त्यांचा कार्यक्रम ठेवू, असा टोला गोगावले यांनी तटकरेंना लगावला आहे.

100 रूपयांची राखी अॅमेझॉनला पडली 40 हजारांना; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आता दिसत आहेत. तटकरे यांनी हुबेहूब भरत गोगावले यांची नक्कल केल्यामुळे गोगावले समर्थकांमध्ये संतापाची लाट असल्याचं दिसून येतंय. सुनिल तटकरे यांच्या नॅपकिन नक्कलवर (Raigad Politics) मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार पलटवार केलाय. भरतशेठ यांच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येत नाही, असं गोगावले यांनी म्हटलंय. खांद्यावर डोक्यावर नॅपकिन घेऊन चालत नाही, त्याला मनापासून घ्यावं लागतं असं देखील त्यांनी म्हटलंय.

विष्णू चाटेने अर्ज मागे घेतला तर वकिलांची पेन ड्राईव्हची मागणी, संतोष देशमुख प्रकरणात आज न्यायालयात काय घडलं?

यावर भरतशेठ म्हणाले की, प्रश्न असा आहे की भरतशेठच्या नॅपकीनची नक्कल सर्वांना करता येत नाही. आम्ही वेटरसारखा नॅपकीन खांद्यावर घेत नाही. नॅपकीन आम्ही अशा पद्धतीने घेतो की, या नॅपकीनमध्ये काय जादू आहे? असं ते दोनवेळा सभेमध्ये बोलले आहे. या नॅपकीनमध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. जे भरतशेठ एवढ्या वर्ष गोरगरिबांना सामोरं जात आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत.

नॅपकीन खांद्यावर ठेवल्यावर पडतो, काखेत ठेवल्यावर व्यवस्थित राहतो. ही माझी पद्धत आहे. मी काय काल-परवापासून नॅपकीन वापरत नाही. अनेक वर्ष वापरत आहे. मला ती आता सवय झालेली आहे. तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला (Maharashtra Politics) आम्ही ट्रेनिंग देऊ. नॅपकीन कुठे ठेवायचा, कसा घ्यायचा, कसा वापर करायचा? आम्हाला वाटलं नव्हतं की, एवढे नकलाकार असतील, पाऊस उघडल्यानंतर त्यांचा एखादा प्रोग्राम आम्ही लावू, असा देखील टोला भरतशेठ गोगावले यांनी सुनील तटकरे यांना लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube