मराठी, मराठी करता आम्ही काय लंडनहून आलोयं का? ठाकरे बंधूंच्या युतीवरुन बावनकुळे संतापले..
मराठी, मराठी करता आम्ही काय लंडनहून आलोयं का? या शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंना संतापून सवाल केलायं.
Chandrashekhar Bawankule On Thackeray Brothers : तुम्ही सारखं मराठी मराठी करता, मग आम्ही काय लंडनहून आलोयं का? असा थेट सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव आणि राज ठाकरे (Thackeray Brothers) यांना केलायं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची नुकतीच घोषणा झाली. मराठीच्या मुद्द्यावरुन उद्धव आणि राज ठाकरे यांनी भाष्य केलं. ठाकरे बंधूंच्या या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
ईशान्य भारतात हिंसाचार! आसामच्या आंगलोंगमध्ये आंदोलन चिघळलं, परिसरात कर्फ्यू लागू
पुढे बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरेंकडे विकासाचा काही अजेंडा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीसांचं विकसित महाराष्ट्राचं धोरणावरच मतदान मिळणार आहे आता सारे मुद्दे गौण ठरणार असून
मतचोरीच्या मुद्द्याला काही एक अर्थ नाही . ठाकरेंकडे विकासाचा मुद्दा नाहीये. भावनिक आवाहन महाराष्ट्राच चालणार नाही. जनता सुजाण आहे विकसित मुंबईला मतदान करतील. विकासाच्या मुद्द्यावरच जनता मतदान करणार आहे. आम्ही सर्व मराठी आहोत, इंग्रजी नाहीत आम्ही काही लंडनमधून आलो का? असा थेट सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलायं.
भाजपत मुनगंटीवार एकनाथ खडसेंची पुनरावृत्ती करणार की देवेंद्रंना शह देणार? राजकीय वर्तुळात खळबळ…
तसेच महाराष्ट्रातील सर्वच मराठी माणसं मराठी मराठी करुन मराठी भाषेचा अपमान सावरकरांचा अपमान तुम्ही केलायं. उत्तर भारतीय कसे खराब हे ते बोलत होते आता ते मतदानासाठी वेगळं बदलत आहेत. दिवसाला सरड्यासारखा रंग बदलत आहेत. इतिहासात किंचित मतदान ठाकरेंच्या पक्षाला मिळणार आहे. धाराशिवमध्ये उमेदवार निवडून आल्यानंतर पाकचे झेंडे भिरकावले गेले राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंना याबाबत विचारावं. विधानसभेत नुकसान, पायाखालची जमीन सरकरली, हिंदुत्वाच्या विचाराला छेडण्याचं काम केल्याने जनतेने त्यांना सोडलंय. म्हणूनच लोकं एकनाथ शिंदेंकडे चालले असल्याची जहरी टीका बावनकुळे यांनी केलीयं.
‘बी-टीम’ च्या आरोपांवर थोरातांचा पलटवार; थोरात साहेबांविषयी तक्रार नाही पण… रोहित पवारांचं स्पष्टीकरण
दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचे वरळीतील हॉटेल ब्लू सी येथे आगमन झाले. याठिकाणी ऐतिहासिक युतीची घोषणा ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी पाहण्यास मिळाली. ज्यावेळी मंचावर राज आणि उद्धव आले. त्यावेळी स्वतः राज ठाकरेंनी संजय राऊतांना मंचावर बोलवून घेतले. युतीच्या घोषणेवेळीदेखील राऊत दोन्ही ठाकरे बंधूंच्यासोबत अगदी सावली सारखी उभे असल्याचे पाहण्यास मिळाले. एवढेच काय तर, पत्रकार परिषदेची सुरूवातदेखील राऊतांनी केली.
