‘उपोषण सुटण्याआधीच मौजमजा..,’; देहरादून दौऱ्यावरुन नितेश राणेंची टीका

‘उपोषण सुटण्याआधीच मौजमजा..,’; देहरादून दौऱ्यावरुन नितेश राणेंची टीका

Nilesh Rane On Udhav Thackeray : मराठा आरक्षणासंदर्भातील उपोषण सुटण्याआधीच उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) कुटुंबियांसोबत देहरादूनला मौजमजा करायला जात असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे(Nilesh Rane) यांनी केली आहे. दरम्यान, काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं. यावेळी उद्धव ठाकरे राज्यात नव्हते. यावरुन नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Bacchu Kadu : ‘आता सरकारने शब्द पाळला नाही तर’.. बच्चू कडूंचा सरकारला रोखठोक इशारा

नितेश राणे म्हणाले, काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसोबत खाजगी विमानातून देहादूनला निघून गेले. राज्यात एकीकडे मराठा आरक्षण सुरु असताना देवेंद्र फडणवीस दिल्लीला प्रचाराला कसे जातात? असे प्रश्न ठाकरे विचारत होते, कामगारांकडून अग्रलेख लिहुन घेत होते, आता महत्वाचं उपोषण सोडून कुटुंबासोबत मौजमजा करायला जात असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे.

Maratha Reservation : कुणबींसुद्धा मोठा भाऊ म्हणून… अमोल मिटकरींच्या वक्तव्याने वादची शक्यता

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 365 दिवस पक्षासाठी देत असतात. जनतेसाठी त दिवसरात्र एक करुन काम करतात. तुमच्यासारखे मजामस्ती करीत नाहीत, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

लढा ‘सत्तेचा’ नाही तर ‘सत्याचा’; Rohit Pawar यांची सडेतोड मुलाखत

उद्धव ठाकरे हेच का तुमचं राज्यावरच प्रेम? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. राज्यात महत्वाचा प्रश्न सुटत असताना त्याचं तुम्हाला काहीच पडलं नाही, त्याचं उत्तम उदाहरण काल तुम्ही दाखवून दिलं, असंही ते म्हणाले आहेत.

Maratha Reservation : आरक्षणावर रितेश देशमुख, हेमंत ढोमे हे सेलिब्रिटी नेमकं काय म्हणाले? कोणी दिलं आंदोलनाला समर्थन?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मनोज जरांगे यांनी काल नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे.

सरकारने दगाफटका केला तर त्यांच्या नाड्या आवळू. त्यांच्या अर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक नाड्या आवळू.. थेट मुंबईत जाऊन बसायचं… त्यांना भाजीही द्यायची नाही. त्यामुळं दगाफटका बसला तर आत्तापासूनच तयार राहा, असा कडक शब्दांत इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube