पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ! बावनुकळेंचे DCM शिंदेंना खडेबोल, ‘हे योग्य नाही, आंदोलनं रोखा…’
Chandrashekhar Bawankule : रायगडचं (Raigad) पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) न मिळाल्याने शिवसैनिक संतप्त झाले. शिवसैनिकांना सुनील तटकरेंचा निषेध करत टायर्सची जाळपोळ केली होती. यावर आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केलं. शिवसेनेच्या (Shivsena) नेतृत्वाला त्याची योग्य ती दखल घेण्याचे त्यांनी केलं.
भाजपला पैशांची गरज म्हणून त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद हवं, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पालकमंत्रीपदावरील धुसफूसीसंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरून निदर्शने केली. हे योग्य नाही. अशी निदर्शने त्या पक्षाच्या नेतृत्वाने थांबवली पाहिजे. नाशिकमधील भाजपची निदर्शने आम्ही रोखली. आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या निदर्शनांची योग्य ती दखल घेतली पाहिजे, अशा शब्दात बावनकुळे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.
आयआयटीयन बाबांची महाकुंभातून हकालपट्टी; कोणाकडे असतो कुंभातून बाहेर काढण्याचा अधिकार?
राजन साळवी भाजपमध्ये येणार?
ठाकरे गटाचे नेते राजन साळवी भाजपमध्ये कधी सामील होणार? असा प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले की, माझी त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. एखाद्यावेळी साळवी यांचा विचार बदलू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर ते नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांची काँग्रेसधार्जिणी विचारधार ठाकरे गटातील कोणत्याही नेत्याला मान्य नाही, असं ते म्हणाले.
महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. यामध्ये रायगडचे पालकमंत्रीपद महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यावर शिवसेनेनं आक्षेप घेत रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं, अशी मागणी लावून धरली आहे.
पालकमंत्री पदाबाबत शिंदे काय म्हणाले?
पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर महायुतीत धूसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर सर्व प्रश्न सुटतील. पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण यात वावगं असं काहीच नाही. गोगावलेंनी गेल्या अनेक वर्षांपासून रायगडमध्ये काम केलं आहे. त्यामुळं अशी अपेक्षा ठेवून मागणी करण्यात काही गैर नाही. मी महायुतीत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत. आपण तिघे बसून यावर चर्चा करून तोडगा काढू, असं शिंदे म्हणाले.