भुजबळ अजिबात नाराज नाहीत; आशीर्वाद घेत भाजपच्या ‘संकटमोचक’ महाजनांची स्पष्टोक्ती
नाशिक : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांनी नाराज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भुजबळ अजिबात नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या नाराजीच्या चर्चा निर्थक असल्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले. महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे. प्रचाराला शेवटचे दोन दिवस बाकी राहिले आहेत त्या पार्श्वभूमीवर तसेच माझा आज (दि.17) वाढदिवस असल्याने त्यांची भेट घेत भुजबळांचे आशीर्वाद घेतल्याचे महाजन म्हणाले. (Girish Mahajan On Chhagan Bhujbal Displeasure)
Ground Report : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचं वजन वाढलं… त्यांची मतेच ठरवणार ‘नाशिकचा’ खासदार!
महाजन म्हणाले की, मोदींच्या सभेत भुजबळांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. मोदीजींनी कशासाठी पंतप्रधान करायचे आहे. हे त्यांनी सांगितले. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक आहेत. निवडणुकी संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगत मतदार संघातील अनेकांना फोन करून नियोजन केल्याने चर्चा जास्तवेळ चालली. भुजबळ आज गडकरींच्या सभेला उपस्थित राहतील असेही महाजनांनी स्पष्ट केले.
तुम्ही तुमचं सांभाळा; भुजबळांचा देशमुखांना टोला
माझं कोणाशी बोलण झालं नाही असे तटकरे यांनी मला सांगितले आहे. त्यामुळे अनिल देशमुखांनी त्यांच्या पक्षातील लोक इकडे येणार नाही त्याची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी डिपार्टमेंट राखून ठेवले आहे असा टोला देशमुखांना लगावत जे योग्य आहेत त्यांना घेऊ असे भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्रात भाजपला धक्का की बोनस? इतिहासातल्या ‘या’ गोष्टी सांगतात तरी काय..
शांतीगिरी महाराजांचे भक्तगण ऐकण्यास तयार नाही
नाशिकमधून शांतीगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शांतीगिरी महाराजांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, या प्रयत्नांना अखेरपर्यंत यश आले नाही. शांतीगिरी महाराजांनी माघार घ्यावी असं आमचं म्हणणं होते पण, त्यांचे भक्तगण ऐकायला तयार नसल्याचे महाजन म्हणाले. जरी त्यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरी, इतर ठिकाणी त्यांची आम्हाला मदत मिळत असल्याचे महाजन म्हणााले.