मंत्रिपद न देऊन अवहेलना, लेकिन मैं उस पुराने जमाने का सिक्का हू, फेंक ना देना..; भुजबळांचा अजितदादांवर रोख
Chhagan Bhujbal : महायुती (Mahayuti) सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)हे नाराज झालेत. नाराज झालेल्या भुजबळांनी माध्यमांसमोर आपली नाराजी थेटपणे बोलून दाखवली. यानंतर बुधवारी (18 डिसेंबर) नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर करत शेलक्या शब्दांत अजित पवारांवरही (Ajit Pawar) निशाणा साधला.
बाबासाहेबांचा अपमान! अमित शाहांच्या तोंडून मनोविकृती बाहेर, उद्धव ठाकरे चांगलेच कडाडले
नाशिकमध्ये बोलताना भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आणि मराठा आरक्षणावर भाष्य करताना भुजबळांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही पहिली मागणी माझीच होती. मात्र, वेगळ्या आरक्षणाच्या मागणीवर माझी ठाम भूमिका होती. मी कधीच मराठा समाजाच्या विरोधात नव्हतो. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाला संघटीत होण्याचे आवाहन केले. बीडसारखी परिस्थिती पुन्हा होऊ देऊ नका. एकजुटीने राहिलो तरच आपण सुरक्षित राहू, असं ते म्हणाले.
प्रसाद ओकच्या केसची धुरा सांभाळणार स्वप्नील जोशी, जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित
अवहेलनेचं शल्य बोचतयं..
यावेळी अजित पवारांवर बोलतांना भुजबळ म्हणाले की, प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही. किती वेळा मंत्रिपदे आली आणि किती वेळा गेली. इतकचं विरोधी पक्षातही बसावे लागले. पण ओबीसी समाजाने सरकारला एवढं दिल्यानंतर असं का? हे कशासाठी? यामागे तुमचा हेतू काय आहे? तुम्ही अवहेलना करण्याचं शल्य मनात टोचतयं, असं भुजबळ म्हणाले.
मला सांगायचे आहे, मै मोसम नहीं, जो बदल जाऊ… मै इस जमीन से दूर कही और ही निकल जाऊ… मै उस पुराने जमाने का सिक्का हू, मुझे फेंक ना देना… हो सकता है, तुम्हारे बुरे दिनों मैं यही सिक्का चल जाए, या शायरीच्या माध्यमातून भुजबळांनी अजितदादांना सुचक इशाराही दिला.
अजितदादांनी चर्चा केलीच नाही…
मंत्रिपदावर बोलतांना भुजबळ म्हणाले, आम्ही चर्चा करू असे अजितदादा म्हणाले, पण प्रत्यक्षात त्यांनी चर्चाच केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माझ्या मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला, पण त्यांच्याही शब्दांना वजन दिले गेले नाही. त्यानंतर आता मला गावागावातून, जिल्ह्या-जिल्ह्यातून फोन येत आहेत… भुजबळ साहेब या… ताकद वाढवा… मी संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है, असं भुजबळ म्हणाले.
चर्चा करून पाऊल उचणार
ते म्हणाले, मी सर्वांशी चर्चा करेन. मी उद्या मुंबईला जाणार आहे. आम्हाला देशातील, राज्यातील नेत्यांशी चर्चा करायची आहे आणि मग आपल्याला पाऊल उचलावे लागेल, असा इशारा देत मंत्रीपदावर नसलो तरी या मागासवर्गीयांसाठी शेवटपर्यंत लढणार, अशी ग्वाही भुजबळांनी दिली.