बॅनरवर फोटो नसला तर काय झालं? लाखो गरिबांच्या हृदयात माझा फोटो; छगन भुबजळ
Chhagan Bhujbal : आमदार माणिकराव कोकाटेंची (Manikrao Kokate) कृषीमंत्रीपदी (Minister of Agriculture) वर्णी लागली. त्यानंतर ते पहिल्यांदाच नाशिकला दाखल झाले. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचे शहरात मोठे बॅनर लागले. मात्र या बॅनरवर छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) फोटो गायब आहे. यावर आता भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.
खातेवाटप होताच DCM एकनाथ शिंदेंनी गाठले दरेगाव, तीन दिवस करणार मुक्काम, नेमकं कारण काय?
कोकाटेंनी बॅनरवर जरी आपला फोटो लावला नाही, तरी लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणं ही बाब पुरेशी आहे, असंही भुजबळ म्हणाले.
मंत्रिमंडळातून डावलल्यामागे गौडबंगाल
नव्या मंत्रिमंडळातून भुजबळांना वगळल्यानंतर आता ओबीसी नेते एकत्र आले आहेत. छगन भुजबळ यांनी सुमारे तासभर ओबीसी नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीका केली. ते म्हणाले, आपल्याला मंत्रिमंडळातून डावलल्यामागे काहीतरी मोठं गौडबंगाल असल्याचं मत ओबीसी नेत्यांनी बोलून दाखवलं. माात्र, मी एकटा नाही, पूर्ण ओबीसी समाज माझ्यासोबत आहे. ओबीसी समाजातील विविध नेत्यांनी आपली भेट घेऊन आमच्यासोबत असल्याचे सांगितले.
Parbhani violence : राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेणार भेट
भुजबळ म्हणाले, मी लोकसभेची तयारी केली होती. पण नंतर मला थांबवण्यात आलं. त्यानंतर राज्यसभेच्या दोन जागांसाठी संधी होती. पण त्यावेळीही मला तुमची गरज आहे, असं सांगून मला थांबवण्यात आलं. आता मंत्रिमंडळात बिनकामाचे नेते घेतले अन् कामाचा नेता बाहेर ठेवला, असा टोला भुजबळांनी लगावला.
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बॅनरवर जरी आपला फोटो लावला नाही, तरी लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणं ही बाब पुरेशी आहे, असंही भुजबळ म्हणाले.
भुजबळांनी पंतप्रधान व्हावे…
माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी भुजबळ यांनी राज्यसभेवर जावे असे तुम्हाला वाटते का? असा सवाल केला असता कोकाटे म्हणाले, त्यांना जे काही पाहिजे ते त्यांनी मागावे. आम्ही याआधी अनेकदा आमदार होतो. मात्र, आम्हाला कधी मंत्रिपद मिळालं नाही. त्यावेळी भुजबळ मंत्री झाले होते. मात्र, आम्ही नाराज झालो नव्हतो. आता भुजबळांना पक्षाने शब्द दिला असेल तर शब्द पूर्ण होईल ना… पण, मला काय वाटते, याला काही अर्थ नाही. मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, पण मला जे वाटते ते देशात, जगात होईलच असं नाही.