मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे, तसा मी ठाकरेंना दिसतो; CM शिंदेंचा हल्लाबोल

मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे, तसा मी ठाकरेंना दिसतो; CM शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde attack on Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) उल्लेख मांडूळ असा केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. मुगल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायचे. तसं उद्धव ठाकरेंनी मी दिसतो, असा टोला त्यांनी लगावला.

Kanguva: बॉबी देओल पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत, ‘कांगुवा’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित 

एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंकडून होत असलेल्या टीकेविषयी विचारलं असता शिंदे म्हणाले, मुगल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायचे. तसं उद्धव ठाकरेंनी मी दिसतो. महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे त्यांना अजून हजम झालं नाही. त्यामुळं बसता-उठता, खाता-पिता मी त्यांना सर्वत्र दिसतो. स्वप्नातही मी त्यांना दिसतो, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

मनसैनिकांच्या हल्ल्यानंतर ‘उबाठा’ सेनेची फाटलीयं; आशिष शेलारांची जीभ घसरली 

पुढं बोलतांना ते म्हणाले, सरकार आज पडेल, उद्या पडेल असं ते सांगायचं. मात्र, आमचं सरकार मजबुतीने उभं, असा दावाही मुख्यमंत्री शिंदेंनी केला. लाडकी बहीण योजनेवरून विरोधककांकडून होत असलेल्या टीकेविषयी विचारलं असता शिंदे म्हणाले, जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. तेच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेत  आहेत. पोस्टर्स का लावत आहेत. विरोधकांचीभूमिका दुटप्पी आहे, अशी टीका त्यांनी केली.

परमबीर सिंह यांनी फडणवीस यांच्याशिवाय एकनाथ शिंदेंनाही अटक करण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असा दावा केला. त्या व्याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, होय, ही वस्तुस्थिती आहे. मलाही अडवण्याचा आणि खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, त्यांची कोंडी करणं हे मी समजू शकतो. मात्र, मी तर त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तरीही मला अटक करण्याचा प्रयत्न केला गेला. मी यावर सविस्तर बोलेन, असं शिंदे म्हणाले.

तेव्हा ते आले नाहीत….
आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी शरद पवारांनी केली. त्यावरून शिंदेंनी पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, याआधी सर्व पक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. आम्ही येणार-येणार अस विरोधक म्हणाले. पण, ते आले नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या टीकेला आता उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube