वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं? अजितदादांनी शरद पवारांना थेट विचारलं
Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच पवार कुटुंबातही बारामती लोकसभा मतदारसंघावरुन (Baramati Loksabha) जोरदार वाकयुद्धच सुरु आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) अजितदादांचे वडिल माझ्याकडेच उपचार घेत असल्याचं सांगितलं. त्यावरुन माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार घेण्यासाठी नेलं होतं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना केलायं.
दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं
काय म्हणाले होते शरद पवार?
मागील अनेक दिवसांपासून शरद पवार अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. शरद पवारांच्या टीकेनंतर अजित पवारही सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. एका मुलाखतीदरम्यान बोलताना शरद पवार यांनी सांगितलं की, अजित पवार यांचे वडिल माझे बंधू अखेरच्या काळात माझ्याकडे उपचार घेत होते, आत्ता बोलणारे लोकं एकदाही बघायला आले नसल्याची टीका शरद पवार यांनी अजित पवारांवर केली होती.
शरद पवार यांच्या या टीकेवर उत्तर देताना अजित पवारांनीही सडकून टीका केलीयं. माझे वडील वारले त्यावेळी मी माझा भाऊ लहान होतो. त्यामुळेच ते त्यांच्याकडे उपचारासाठी गेले. वडील वारले तेव्हा दहावीत असेल तुम्ही दहावीत असताना तुमच्या वडीलांना तुमचे काका घेऊन गेले तर काकांवर तेवढा विश्वास पाहिजे ना, आपण गैरविश्वास दाखवू शकतो का? असा सवालही अजित पवार यांनी केलायं.
‘शिरुरची लोकं हुशार, एकदाच तिकीट घेतात नाटक फ्लॉप निघालं तर..’ फडणवीसांचे कोल्हेंना खोचक टोले
माझ्या वडीलांना घरातील प्रमुख व्यक्तीने उपचारासाठी नेलं तर मग 15 वर्षांच्या मुलाने लुडबूड करण्याची काय गरज? वडीलांना कोणत्या आजारासाठी उपचारासाठी नेलं होतं, हे त्यांना सांगावं, तसेच कोणता आजार झाला होता, डॉक्टर कोण होतं हेही त्यांना सांगावं, असंही अजित पवार म्हणाले आहेत.