एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही; ‘भाजपचं सरकार स्वबळावर’ म्हणणाऱ्या शहांना दादांचं उत्तर
Ajit Pawar Speak On Amit Shah : राज्यात पुढील काळात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुंबई दौऱ्यात एक मोठं विधान केलंय. 2029 साली भाजपचं सरकार स्वबळावर येणार असल्याच शाह म्हणाले आहेत. शहा यांच्या विधानावर एका पक्षाच्या बळावर सरकार येणार नसल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलंय. अमित शाह मुंबईत भाजपच्या बैठकीत बोलत होते तर अजित पवार यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले आहे.
तिसऱ्या आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? राजरत्न आंबेडकरांनी घोषित करुन टाकलं
अजित पवार म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून 1985 नंतर जवळपास 40 वर्षे एकाच पक्षाचं सरकार कधीच आलेलं नाही. देशातल्या इतर राज्यांत वेगळी परिस्थिती आहे. भाजपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण एकाच पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीच अमित शाह असं म्हणाले असतील, असं अजित पवार यानी सांगितले.
मोठी बातमी! तिरुपती प्रसाद प्रकरण, ‘भेसळयुक्त तुपा’बाबत एसआयटीच्या तपासाला स्थगिती
आम्ही टीका करत नाही तर काम करतो…
माध्यमांमध्ये मी तिसऱ्या आघाडीचा चेहरा होईल, असं सांगितलं जात पण हे असं ऐकून आमचीच करमणूक होते. आमचच आम्हाला कळत नाही. आमची ब्रेकिंग न्यूज चालत असते, तिसरी आघाडी होईल, चौथी देखील होईल. आमच्या सरकारच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असून आम्ही कोणारही टीका करीत नाही, आम्ही काम करणारे आहोत, हेच आम्ही लोकांना सांगत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
मंत्री अमित शाह नेमकं काय म्हणाले?
जे सरकार काम करीत असतं, तेच सरकार निवडणूक जिंक असतं , केंद्रात आपण सलग तिसऱ्यांदा सरकार बनवलंय. आता आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करु नका, मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार होईल. यंदा 2024 साली महायुतीचेच सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेख असून 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचं असून 2029 मध्ये शुद्ध रुपाने कमळचे सरकार असणार असल्याचं अमित शाह म्हणाले आहेत.