‘आता मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन’, उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होताच शिंदेंचा सूर बदलला

  • Written By: Published:
‘आता मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन’, उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होताच शिंदेंचा सूर बदलला

Eknath Shinde : महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार मानले. तसेच मी आधी सीएम होतो, म्हणजे कॉमन मॅन होतो, आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन आहे, अशी मिश्किल टिप्पणी केली.

महायुती सरकार राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल, आशुतोष काळेंना विश्वास 

पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलाय. हे सर्वसामान्यांचे सरकार असून राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे सरकार आहे. हे बाळासाहेबांच्या विचाराचे, सर्व जनतेला सोबत घेऊन जाणारे आणि सर्वांना न्याय देणारे सरकार असल्याचं शिंदे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, देशाला वैचारिक दिशा देणारे महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षांत केंद्र सरकारनेही राज्याला पाठबळ दिले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो.

लाडकी बहीण योजना सुरुच राहणार, पण …, पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य 

तसेच मी आधी सीएम होतो, पण मी स्वत:ला म्हणजे कॉमन मॅन समजत असे. आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन आहे. आता सर्वसामान्य लोकांसाठी अजून जास्त काम करणार आहे, असे शिंदे म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मला चांगली साथ दिली. आम्ही एक टीम म्हणून काम केलं. फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव माझ्यासाठी कामी आलाय. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असं ते म्हणाले.

माझे अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी नाव देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले होते.
आता मुख्यमंत्रीपदासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचवले. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास वेगाने होईल, असे मला वाटते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

गृहमंत्रीपदावरून नाराज होता का, असा सवाल केला असता एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या नाराजीच्या बातम्या खोट्या आहेत. मी गावी गेलो, आजारी पडलो तरी तुम्ही नाराजीच्या बातम्या चालवता, असा टोला शिंदेंनी लगावला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube