काही तडजोडी आवडत नसल्या तरी कराव्या लागतात; अजितदादा गटाबद्दल फडणवीसांचं मोठं विधान

  • Written By: Published:
काही तडजोडी आवडत नसल्या तरी कराव्या लागतात; अजितदादा गटाबद्दल फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) चांगलाच फटका बसला. भाजपला केवळ नऊ जागा जिंकता आल्या. त्यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या ऑर्गनायझर आणि विवेक या साप्ताहिकांमधून अजित पवारांमुळेच (Ajit Pawar) लोकसभेला फटका बसल्याची टीका करण्यात आली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं.

बुद्रुक कोण अन् खुर्द कोण?; मी पुरता गोंधळून गेलोय : संभाजीराजे छत्रपती 

काही तडजोडी तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नसल्या तरी कराव्याच लागतात, असं विधान फडणवीसांनी केलं.

इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांचा महायुतीतील सहभागाबद्द्ल विचारण केली. त्यावर फडणवीस म्हणाले की, मी सर्व काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांगितले आहे. आता फक्त इतरांना सांगायचं बाकी आहे. मी एवढेच म्हणेन की, आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेतलं तेव्हा आमच्या मतदारांना ते अजिबात आवडले नाही. पण जेव्हा आम्ही त्यांच्यासमोर परिस्थिती ठेवली, ते आमच्यासोबत कोणत्या परिस्तितीत आले? कोणत्या परिस्थितीती आम्ही त्यांना सोबत घेतलं? हे आम्ही काही लोकांना सांगितले तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की, राजकारणात अनेकदा अशी स्थिती येते जेव्हा आपल्याला तडडोजी कराव्या लागतात. तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना ज्या तडजोडी करायला आवडत नाही, अशा तडजोडी तुम्हाला कराव्या लागतात. आम्ही अशा तडजोडी केल्या, पण आज आम्ही आमच्या 100 टक्के नाही पण किमान 80 टक्के आम्ही समजावून देऊ शकलो आहोत की, आम्ही हे का केलं, असं फडणवीस म्हणाले.

Game Changer: राम चरणचं चाहत्यांना मोठं गिफ्ट! कियारा अडवाणीसोबत ‘गेम चेंजर’ मधील दुसरं गाणं भेटीला 

दरम्यान, अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर झालेल्या नुकसानावर वेगळा विचार करून त्यात सुधारणा करण्याचा अर्थात कोर्स करेक्शनचा काही विचार आहे का? असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, तसा कोणताही विचार नाही.

फडणवीस म्हणाले की, आता कोर्स करेक्नशची वेळ नाहीये. आणि तसे करणंही योग्य नाही. जो कोर्स चालू आहे, त्याच कोर्सला सामोरं जावं लागले. आम्ही तिन्ही पक्षांना एक वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागेल. अशावेळी, आम्ही फक्त आकड्यावर जाऊन चालणार नाही. आमचा जिंकण्याच्या शक्यतांवर जास्त काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर आम्ही त्यात यशस्वी ठरलो तर तर कोर्स करेक्शनची गरजच नाही, असं फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube