Gopichand Padalkar : ‘यावर मंत्रीच गौडबंगाल करत आहेत’, पडळकरांचा सरकारला घरचा आहेर

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (17)

कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये ( Dhule )  आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar )  यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. यावेळी पडळकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी आदिवासी विभागाचे मंत्री विजयकुमार गावित ( Vijaykumar Gawit )  यांच्यावर टीका केली आहे.  या सर्व प्रकरणामध्ये मंत्रीच गौडबंगाल करत असल्याचे पडळकर म्हणाले आहेत.

आदिवासी जमातीसह 33 जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोक जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती. आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्रीच गौड बंगाल करत असल्याचा घणाघाती आरोप करीत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर निशाणा साधत घरचा आहेर दिला आहे. 2014 पूर्वी विजयकुमार गावित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होते. त्यावरुन पडळकरांनी गावितांवर ही टीका केली आहे.

मा. सभापतींनी या विषयावर उद्या बैठक ठेवली होती. आम्ही ही बैठक नंतर घ्यायला लावली. कारण उद्या लगेच यावर निर्णय होणार नाही. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित पाहिजे. मंत्रीच जर अध्यक्ष असतील तर हा निर्णय होणार नाही. कारण तेच खरा गौडबंगाल करत आहेत, असे म्हणत त्यांनी गावितांना लक्ष केले आहे.

दरम्यान पडळकरांनी  शरद पवार व संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. म्हणून , त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे म्हणत त्यांना लक्ष केले आहे.

Tags

follow us