तब्बल 10 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे…आता शिंदे, शिवसेना पुन्हा पेचात

तब्बल 10 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे…आता शिंदे, शिवसेना पुन्हा पेचात

Eknath Shinde Have Same Trouble Like Uddhav Thackeray : महायुती सरकारच्या शपथविधीला (Maharashtra CM) अवघ्या काही मिनिटांचा अवधी उरलेला आहे. राज्यात आज महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी अखेर भूमिका जाहीर करत सस्पेन्स संपवला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सस्पेन्स कायम होता. अखेर तो आता संपला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाचं पत्र देखील राजभवनावर पाठवण्यात आलंय. 2014 मध्ये उद्धव ठाकरे यांची कोडी झाली होती, तशीच यंदा एकनाथ शिंदे यांची कोंडी होताना दिसत आहे. राज्यात तब्बल 10 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

शाहू महाराजांना बाजूला सारणे खपवून घेणार नाही, शपथविधीच्या जाहिरातीवरून संभाजीराजे संतापले…

महाराष्ट्रात 2014 साली विधानसभा निवडणुकीत सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते. राज्यात भाजप पक्षाला 122 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना 63 तर भाजपला 23 जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी 23 आमदारांच्या पाठिंब्याची भाजपला गरज होती. त्यामुळे शिवसेना पक्षाची बार्गेनिंग देखील वाढली आहे. परंतु शरद पवार यांच्या पक्षाने भाजपला पाठिंबा दिला अन् भाजपचं सरकार स्थापन सरकार झाले. देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले. तर शिवसेनेला मात्र विरोधी बाकावर बसावं लागलं.

सत्तास्थापनेनंतर पहिला निर्णय ‘लाडकी बहीण योजने’चा ; दीपक केसरकरांनी काय सांगितलं?

त्यानंतर आमदारांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत जाणं नितांत गरजेचं असल्याचं सांगितलं. या पार्श्वभूमीवर 5 डिसेंबर रोजी 2014 साली शिवसेना देखील फडणवीस सरकारमध्ये सामील झाली होती. उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेण्यामागे एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्वाची होती, असं सांगितलं जातंय.

आता 2024 मध्ये पुन्हा सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु आहेत. यावेळी देखील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच बार्गेनिंग पॉवर घटल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुमतापुढे शिवसेनेला बॅकफूटवर यावं लागलं. सत्तेबाहेर राहून भाजप -राष्ट्रवादीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा विचार एकनाथ शिंदे करत होते. परंतु आमदारांनी सत्तेत बसण्याचा आग्रह केल्याने ते उपमुख्यमंत्री होण्यास राजी झाले आहेत. त्यामुळे 2014 साली उद्धव ठाकरे ज्या पेचात अडकले होते, तशीच कोंडी आता एकनाथ शिंदेंची झाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube