‘नोव्हेंबरमध्ये माझ्यावर पहिला हल्ला’: Pradnya Satav यांची धक्कादायक माहिती
काँग्रेसचे ( Congress ) दिवंगत नेते राजीव सातव ( Rajeev Satav ) यांच्या पत्नी व काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव ( Pradnya Satav ) यांच्यावर हल्ला करण्यात हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. पण आता या हल्ल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्यावर नोव्हेंबरमध्ये पहिला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबरमध्ये आम्ही भारत जोडो यात्रेची तयारी करत होतो. त्यावेळी पेडगावमध्ये एके दिवशी अचानक दुपारच्यावेळेला माझ्यावर हल्ला झाला. त्यानंतर आता कळमनुरीत माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी माहिती सातव यांनी दिली आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात लोकांमध्ये काम करत आहोत. आम्हाला जनतेचा चांगला पाठिंबा मिळतो आहे. त्यामुळे आम्हाला घरी बसवण्यासाठी हा हल्ला केला असू शकतो. पण मी घाबरणार नाही, लढत राहणार असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले आहे.
हल्लेखोराला हा हल्ला करायाल कोणी तरी सांगितले आहे. जोपर्यंत या हल्ल्यामागील खऱ्या सूत्रधाराचे नाव समोर येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. एका महिला आमदारावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला असल्याचे सातव म्हणाल्या आहेत.
दरम्यान पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव महिंद्र असे आहे. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांचा पोलिसांवर वचक नसल्याची टीका त्यांनी केली आहे. हा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी पटोलेंनी केली आहे.