ठाकरेंची मशाल न घेता माजीमंत्री गडाख निवडणुकीच्या रिंगणात…हे आहे नव पक्ष चिन्ह

Shankarrao Gadakh यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

Shankarrao Gadakh

Former MLA of Thackeray group, Shankarrao Gadakh, has resigned from the Party : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे मात्र सर्वच पक्षांमधील आउटगोइंग आणि इन्कमिंग म्हणजेच पक्ष बदलांचे वारे जोराने वाहत आहेत. यातच आता अहिल्यानगरमधून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरेंना पक्ष फुटीच्या वेळी मोलाची साथ देणारे नेते माजी आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.

आजपासून नगरपरिषद, नगर पंचायतींसाठी अर्ज भरायला सुरूवात! असंख्य उमेदवार आजमावणार नशीब

शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक पक्षाचे मशाल चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गडाख यांनी यापूर्वी सन २०१७ मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. विधानसभेत विजयी झाल्यानंतर अपक्ष असलेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले होते.

ऊस रोपातून केलेली लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान, कर्मवीर कृषी महोत्सवात डॉ. अंकुश चोरमुले यांचं प्रतिपादन

मात्र, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष फुटल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत गडाख हे कायम होते. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. तर त्या अगोदर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात गडाख यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण विभागाचे मंत्रीपद होतं.

कुणाला धनलाभ तर कुणाला खरेदीचे योग कसं आहे 10 नोव्हेंबरचं राशीभविष्य?

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्ष बांधणी महत्त्वाची असताना ठाकरेंना मात्र अहिल्यानगरमधून हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

follow us