श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; घनःश्याम शेलारांचा नागवडेंना पाठिंबा
Ghanshyam Shelar Support To Anuradha Nagawade In Shrigonda : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत (Assembly Election 2024) यंदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत घनःश्याम शेलार यांनी नागवडे यांना पाठिंबा दिला आहे. घनःश्याम शेलार (Ghanshyam Shelar) हे मागील विधानसभा निवडणुकीत अल्प मतांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडून पराभूत झाले होते.
श्रीगोंद्यात आता महाविकास आघाडीची (Shrigonda) ताकद वाढल्याची चर्चा सुरू आहे. घनःश्याम शेलार यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रहारकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या वेळी त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर ते प्रचारात सक्रिय नव्हते. आज त्यांनी नागवडे यांच्या प्रचारसभेत येऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढल्याची मतदारसंघात चर्चा आहे.
संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास…झरी आणि गुऱ्हाळ येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश!
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातच आता जिल्ह्यातील लढती देखील स्पष्ट झाल्या आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या अनुराधा नागवडे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. मतदार संघामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी अनुराधाताई घेत आहे. तसेच श्रीगोंदा-नगर मतदार संघातील जन-आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सुरु असलेल्या प्रचारादरम्यान जनकौल देखील नागवडे यांना मिळतो आहे.
पुढील पिढीला सत्याची शिकवण द्यायची असेल, तर सत्तापरिवर्तन करावं लागेल; राहुल कलाटे
अनुराधा नागवडे यांनी मतदार संघामध्ये प्रचाराचा झंझावात सुरु ठेवला आहे. गावोगावी जात त्या मतदार संघातील प्रश्न जाणून घेत आहे. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद त्यांना मिळत असल्याचं दिसत आहे. आता श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे. घनशाम शेलार यांनी अनुराधा नागवडे यांना पाठिंबा दिल्यामुळे मतदारसंघातील त्यांचा पाठिंबा वाढल्याच्या चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहेत.