‘इर्शाळवाडीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये नाहीतर चिखल..,’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
इर्शाळवाडीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये नाहीतर चिखल तुडवत गेलो असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुसऱ्यांदा ईर्शाळवाडी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दरडग्रस्तांच्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे.
काका-पुतण्याची जवळीक; ‘मविआ’त नव्या घडामोडी : आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल
पुढे बोलताना ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून ‘सरकार पडणार..सरकार पडणार’ असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी अनेक ज्योतिषं पाहिली आहेत. मात्र, माझ्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे सरकार अधिक मजबूत झालं असून विरोधकांना राजकारण करु द्या, मी माझं काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्याचं कारण दाखवत मुख्यमंत्रिपदावर दुसऱ्याचीच वर्णी लागणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. या आरोपावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच माझी तब्येत चांगली असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेतील कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. या 42 कुटुंबांचं पुनर्वसनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या जागेची पाहणी केली आहे. सिडकोच्या माझ्यमातून 42 घरे बांधण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.