नितीश कुमारांना महाराष्ट्रात धक्का ! जनता दल महाविकास आघाडीत
Janta-Dal-united-join-Mahavikas-Aghadi मुंबई: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली आहे. भाजपच्या पाठिंब्यावर ते पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे जनता दल यूनायटेड (Jjanta-Dal-United) हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. महाराष्ट्रात मात्र उलटे चित्र आहे. नितीश कुमारांचा जनता दल हा पक्ष महाविकास आघाडीत (Mahavikas Agadi) सहभागी झाला आहे. त्याचबरोबर आणखी काही पक्षही महाविकास आघाडीत आले आहेत.
Ahmedngar News : मान डोलवणारे नंदीबैल नको, वाघसारखा लोकप्रतिनिधी हवा… कोल्हेंचा रोख कुणाकडे?>
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हा महाविकास आघाडीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला जनता दल यूनायडेटचे राष्ट्रीय महासचिव व आमदार कपिल पाटील हे उपस्थित होते. पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून मी महाविकास आघाडीत सहभागी झालो आहे. महाराष्ट्रात जनता दल यूनायडेट हा पक्ष महाविकास आघाडीबरोबर राहणार असल्याची प्रतिक्रियाही आमदार कपिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
महाविकास आघाडीचा आज विस्तार झाला आहे. या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,
रवींद्र चव्हाण, अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे काही प्रतिनिधी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीही महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले.
‘वडेट्टीवार मविआ अन् काँग्रेसमध्ये एकटेच’; भुजबळांना समर्थन देताच तटकरेंची टीका
त्याचबरोबर काही नवीन मित्रही महाविकास आघाडीत आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा विस्तार झाल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. सीपीआय, सीपीआय (एम), शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेट, वंचित बहुजन आघाडी
या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच 2 फेब्रुवारीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.