Ahmedngar News : मान डोलवणारे नंदीबैल नको, वाघसारखा लोकप्रतिनिधी हवा… कोल्हेंचा रोख कुणाकडे?
Ahmedngar News : राज्यात येत्या काळात निवडणुका आहे. मात्र आता विकासासाठी युवकांनी विचार करणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये ढुमक वाजलं की गुबुगुबू मान डोलावणारे नंदी बैल पाठवायचे नाही. तर आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ दिल्लीत पाठवायचे अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निशाणा साधला. मात्र कोल्हे यांचा निशाणा हा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर तर नव्हताना अशी चर्चा मेळाव्यात रंगली होती.
BMC कर्मचाऱ्यांवर ‘जात’ मुद्द्यावरुन भडकणाऱ्या पुष्करला किरण मानेंनी फटकारलं
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात सुरु केलेल्या युवासंपर्क अभियानाच्या समारोपाप्रसंगी खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. कांदा निर्यात बंदीमुळे एका महिन्यात तब्बल अठराशे कोटींचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ सोयाबीनचे भाव देखील कोसळले आहे. आज राज्यातील बळीराजा हतबल झाला असून आर्थिक संकटात आहे असे यावेळी कोल्हे म्हणाले.
तसेच पुढं बोलताना कोल्हे म्हणाले, महागाईचा भडीमार सुरु आहे. मात्र हे केवळ अच्छे दिन आले. अशा वलग्न करत आहे. अर्थव्यवस्थेत देश पाचव्या स्थानावर आहे. असे राज्यकर्ते सांगतायत मात्र तरुणांच्या हाती रोजगार नाही. अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. विचारधारेला प्रश्न विचारण्याचे बंद होतात. तेव्हा विचारधारेचे डबके तयार होतात व जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे बंद होतात. तेव्हा अंधभक्तांच्या टोळी तयार होतात. मात्र या टोळ्यापासून स्वतःला वाचवा. असे आवाहन यावेळी कोल्हे यांनी उपस्थितांना केले.
आज देशामध्ये अनेक समस्यां… प्रश्न भेडसावत आहे. मात्र येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहे. त्यामुळे तुमच्या मतांवर लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहे. जेव्हा तुमच्या हक्काचे तुमच्या हिताचे सरकार येईल तेव्हा नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तरे मिळतील. यासाठी मतदारांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. तुम्ही मतदान करताना ईव्हीएमचे बटन दाबतात. मात्र त्याचे परिमाण पुढचे पाच वर्ष होणार आहे. यामुळे तुम्ही मतदान करताना योग्य विचार करा. असे देखील कोल्हे म्हणाले.