Ravindra Dhangekar : हा पोलिसांचा जुना प्लॅन, ‘त्या’ प्रकरणामुळे माझ्यावर गुन्हा; धंगेकरांचा गंभीर आरोप

Ravindra Dhangekar : हा पोलिसांचा जुना प्लॅन, ‘त्या’ प्रकरणामुळे माझ्यावर गुन्हा; धंगेकरांचा गंभीर आरोप

Ravindra Dhangekar : पुण्यातील कसबा पेठ येथील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली पत्रकार परिषद घेत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर म्हणाले की, ललित पाटील ( Lalit Patil ) प्रकरण मी पुढे आणल्यामुळेच पुणे पोलीस माझ्यावर कारवाई करत आहेत. तसेच हे खोटे गुन्हे भाजपच्या आदेशानेच माझ्यावर दाखल केले जात आहेत. इतकच नाही तर मला दोन-तीन महिने जेलमध्ये टाकण्याचा पोलिसांचा हा जुनाच प्लॅन आहे. असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

देशाच्या संसदेतही घुमणार “मोदी-मोदी अन् जय श्रीराम”चे नारे; शिवसेना आणणार प्रस्ताव

या पत्रकार परिषदेत धंगेकर म्हणाले की, काल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या कर्मचारी संघाने माझ्या विरोधात निषेध सभा घेतली आहे. मुळात इथं सभा घेता येत नाही, अस एक पत्र जिल्हा आधिकारी यांनी यापूर्वीच काढलं आहे. या आवारात महाराजांचा पुतळा आहे. म्हणून तिथं कुठल्याही राजकीय पक्षाला तिथं कुठलेच राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत. त्या जागेत कुठलीही सभा, कुठलाही मोर्चा आणि आंदोलन त्या ठिकाणी घेता येत नाहीत.

भाजप बहुमताचा आसपासही नाही… तरी तावडेंनी सगल तिसऱ्या वर्षी चंदीगडचे मैदान कसे मारले?

काल जे निषेध आंदोलन झालं हे चुकीचं झाल आहे. बेकायदेशीर आहे. महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा त्यांनीय कुठलीही परवानगी घेतली नाही. काल झालेली नियमबाह्य सभा होती. पाण्याच्या टाकीच उद्घाटन करण्यासाठी सगळ्या पक्षाच्या नेत्याने बोलवण्याचा ठराव झाला होता. तरी आधीकारी जगताप यांनी परवानगी न घेता कार्यक्रम घेतला होता. भाजप आमदार यांच्या दवबाव खाली येऊन कार्यकम घेतला. तो कार्यक्रम भाजपमय होता. अधिकारी भाजपमय झाले होते.

Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

त्यांनी मला मुद्दाम अडवलं आमच्या नेत्यांना मारहाण केली आहे. आधिकारी भाजपचे हस्तक झाले आहेत. हा पोलिसांचं जुना प्लॅन आहे. गुन्हा दाखल करून मला मुद्दाम जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि वेळ पडली. तर त्यांची तक्रार मुख्यमंत्री मोहोदयकडे करणार आहे. ललित पाटील प्रकरणात मी सगळं समोर आणत असल्याने माझ्यावर पोलीस कारवाई करत आहेत.

माझ्याकडून जी शिवीगाळ झाली. तो कार्यकर्त्यांऱ्यांचा संताप आणि भावना होत्या. माझी वाढती लोकप्रियता आणि मी करत असणारी कामे बघून जाणूबुजून माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटे कलमं लावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 महिन्यांपासून हे लोक मला अडचणी निर्माण करत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यातील गोखले नगर येथील महानगरपालिकेच्या नवीन पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाच्या कारणावरून आमदार धनगर यांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाचा महानगरपालिकेचे अभियंता संघाने निषेध नोंदवल्यानंतर जगताप यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळे आणल्या प्रकरणी पुन्हा दाखल केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube