‘वडेट्टीवार मविआ अन् काँग्रेसमध्ये एकटेच’; भुजबळांना समर्थन देताच तटकरेंची टीका

‘वडेट्टीवार मविआ अन् काँग्रेसमध्ये एकटेच’; भुजबळांना समर्थन देताच तटकरेंची टीका

Sunil Tatkare News : विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्येही एकटेच असल्याची जळजळीत टीका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते एकवटल्याचं चित्र आहे. अशातच छगन भुजबळांच्या भूमिकेला विजय वडेट्टीवारांनी समर्थन दिल्यानंतर सुनिल तटकरे यांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे.

सुनिल तटकरे म्हणाले, विजय वडेट्टीवारांना छगन भुजबळांबद्दल बऱ्याचं दिवसांनंतर समझदारपणा आला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांची आधी कुठंतरी राजकीय बैठक झाली तेव्हा भुजबळांच्या व्यासपीठावर चढणार नसल्याचं विजय वडेट्टीवारांनी जाहीरपणे सांगितलं होतं. असं माझ्या स्मरणशक्तीत आहेस कदाचित माझ्या स्मरण शक्तीने दगा दिला की काय, असं ते त्यावेळी बोलले होते.

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 मधील तिच्या अनफिल्टर्ड गेमने जिंकली प्रेक्षकांची मन

आता त्यांची मते बदलली आहे. त्या पद्धतीने आता ते काम बघतील. वडेट्टीवार सध्या महाविकास आघाडीत एकटे आहेत की काँग्रेसमध्ये एकटे आहेत, ते नेमके कुठे कुठे एकटे आहेत, कारण रमेश चेनीथाला आलते तेव्हा त्यांना बसायला जागा नाही दिली. त्यामुळे ते उठून गेले. ते कुठे एकटे आहेत त्याचं विश्लेषण मी नाही करत अशी टीका सुनिल तटकरे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणावर राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर आता ओबीसी नेते छगन भुजबळांनी राज्य सरकारविरोधातच उभे ठाकले आहेत. ओबीसी नेत्यांची बैठक बोलावत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच विजय वडेट्टीवारांनीही छगन भुजबळांनी समर्थन दिल्याने राज्यात ओबीसी नेत्यांची एकजूट झाल्याची परिस्थिती आहे. अशातच आता सुनिल तटकरे यांनी छगन भुजबळांच्या भूमिकेवरही थेट भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, नैराश्य आल्यानंतर काही वक्तव्य तथ्यहीन असतात, मी या वक्तव्याकडे पाहू इच्छित नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री छगन भुजबळांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मंडल आयोग अंमलबजावणी झाल्यानंतर देशात अनेक गोष्टी घडल्या. प्रक्षोक उमटला होता. भुजबळ तेव्हापासून या चळवळीत काम करीत आहेत. त्यांचं राजकीय जीवन मंडल कमिशनच्या अंमलबजावणीनंतर त्यांनी या चळवळीतच वाहुन घेतलेलं आहे, त्यामुळे ते भूमिका मांडत असतात. ते मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आहेत यासंदर्भात आपण उद्या दुपारपर्यंत वाट पाहुयात, उद्या त्यांच्या चर्चेनंतर आपल्याला उत्तर मिळणार असल्याचं सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube