एसीच्या घरात जन्माला आलेल्यांना आरक्षणाचे महत्त्व काय कळणार?, आव्हाडांचा राज ठाकरेंना खोचक टोला
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटलेला आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मोठं विधान केलं. महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ प्रोजेक्टमधून करणार नाट्यपदार्पण
जितेंद्र आव्हाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता आव्हाड म्हणाले की, आरक्षण कशासाठी आहे, हे समजून घ्यावे लागतं. एसी वातावरणात, एसीच्या घरात जन्माला आलेल्या लोकांना आरक्षणाचे महत्त्व काय समजणार? आरक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते. ज्यांचे चारही हात तुपात आहेत आणि डोके कढईत त्यांना काय आरक्षण कळणार ?, असा सवाल आव्हाड यांनी केला.
बोंडे, माझ्या नादी लागू नको, फडणवीसांचं करिअर संपेल; मनोज जरांगेंचा इशारा
आर्थिक दुर्बल मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे
आव्हाड म्हणाले, जातीनुसार जणगणना होऊ जाऊ दे, बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला कळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे तेही कळेल. आर्थिक दुर्बळ असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होण्यास हातभार लावू नये, या राज ठाकरेंच्या वक्तव्याचाही आव्हाडांनी समाचार घेतला. ते म्हणाले, शरद पवारांनी कुठल्या कुठल्या समाजासाठी काम केलं. हे मी या क्षणी सांगण्याची गरज नाही. पवारांना आपल्यासाठी काय केलं, हे त्या त्या समाजाला व्यवस्थित माहिती आहे. ओबीसी आरक्षण देण्याचा काम शरद पवार यांनी केलं.
चर्चेत राहण्यासाठी पवारांवर टीका…
आव्हाड म्हणाले, राज ठाकरेंना नेहमीच चर्चेत राहिला आवडते आणि चर्चेत रहायचे असेल तर शरद पवारांचे नाव घ्यावं लागतं. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचं अस्तित्व संपले आहे. शरद पवार यांना उपदेश करायला जाऊ नये. शरद पवार यांनी काय करावं, त्यापेक्षा राज ठाकरे यांनी काय करावं, आपण किती वेळा त्यांनी भूमिका बदलावी याचा त्यांनी विचार करावा, असा खोचक सल्लाही आव्हाडांनी दिला.
राज ठाकरेंनी परप्रांतीय मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतली. अशा माणसाने शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात हे सांगणं हास्यास्पद आहे, असं आव्हाड म्हणाले. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी असते तेव्हा तुम्ही तुमचा बंगला सोडून लोणावळ्याला जाऊन का राहतात ? तुमच्या मनातील जातीद्वेष आणि धर्म द्वेष किती आहे, हे तुमच्या जवळच्या लोकांना चांगलं माहित आहे, अशी टीकाही आव्हाडांनी केली.