बाप हा बाप असतो, बापाला रिटायर करायचं नसतं…; अजितदादांना आव्हाडांचं प्रत्युत्तर

बाप हा बाप असतो, बापाला रिटायर करायचं नसतं…; अजितदादांना आव्हाडांचं प्रत्युत्तर

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षात दोन गट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला. ज्येष्ठांनी मार्गदर्शनक करावं, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी अनेकदा पवारांना दिला. दरम्यान, आज पुन्हा एकदा शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. वय झालं आता कुठंतरी थांबायला हवं, असा सल्ला अजित पवारांनी दिला. त्यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली.

Disqualification MLA : निकालाआधीच राहुल नार्वेकर CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगळी चुल मांडल्यानंतर दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. आज ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले, बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत आलो. वय झाल्यानंतर थांबायला हवं, पण काही जण ऐकत नाही. हट्टीपणा करतात. राज्य सरकारमध्ये ५८ वर्षात निवृत्त होतात. काही जण ६२ व्या वर्षी, तर काही जण ६५ मध्ये निवृत्त होतात. काही जण ७५ व्या वर्षी निवृत्ती स्वीकारतात. परुंतु, काही जण मात्र, 80 व्या वर्षीही थांबत नाहीत. ८४ वर्षांचे झाले तरी निवृत्त होत नाहीत, असा टोला अजित पवारांनी लगावला.

VIDEO : NCP च्या कार्यक्रमात ‘अजितदादां’ऐवजी ‘महेशदादां’च्या घोषणा; चाकणकरांनी भाषण थांबवलं 

दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता आव्हाड म्हणाले की, बापाला रिटायर करायचं नसतं. बाप हा बाप असतो. बाप कधी रिटायर होत नसतो, असा टोला आव्हाडांनी लगाला. बाप कुटुंबातील ऊर्जा स्त्रोत असतो, असंही आव्हाड म्हणाले.

याआधीही आव्हाडांनी अजित पवारांवर टीका केली. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube