ऐन निवडणुकीच्या तोंडावर रक्षा खडसेंविरोधात भाजपमधील खदखद बाहेर
Lok Sabha Election : भाजपमध्ये असलेल्या आणि नुकत्याच रावेर लोकसभेसाठी ( Lok Sabha Election ) पुन्हा उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षा खडसे यांच्या नुकत्याच एका वक्तव्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्याच दरम्यान आता रक्षा खडसे यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचं कारणही त्यांच्या याच वक्तव्याशी काहीच साधर्म्य मी साधणारं आहे. ते म्हणजे खडसे या भाजपचे उमेदवार असूनही शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरतात. तसेच गिरीश महाजन यांचे नावही घेत नाहीत. असा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. त्याचा व्हिडिओ देखील सध्या सर्वत्र व्हायरल होतोय.
Lok Sabha Election: मोदींसाठी आरएसएस कशी ताकद लावतंय ? कसं आहे मायक्रो प्लॅनिंग
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासोबत खडसे यांची मंगळवारी 19 मार्चला एक बैठक झाली. या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी खडसे यांच्या तक्रारी केल्या. त्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरतात. तसेच भाषणांमध्ये गिरीश महाजन यांचे नाव घेत नाहीत. अशा तक्रारी या बैठकीत महाजन यांच्यासमोर मांडण्यात आल्या. त्यावेळी रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्या.
‘मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही’; कोल्हेंचा अजितदादांना सणसणीत टोला
त्यांनी त्या पदाधिकाऱ्याला किती वर्षापासून पक्षात काम करता? असे प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी सडतोड उत्तर देत रक्षा खडसे यांची बोलतीस बंद केली.हा कार्यकर्ता म्हणाला माझ्या वडिलांनी एकनाथ खडसे यांच्या प्रचारासाठी नोकरी सोडली किंवा त्यांना त्यामुळे बडतर्फ करण्यात आलं. त्यामुळे आमचे पूर्ण घर रस्त्यावर आलं. तेव्हापासून मी भाजपात काम करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही मी सक्रिय आहे आणि तुम्ही मला विचारता कधीपासून काम करतो? हे बरोबर नाही ताई. असा इतिहास सांगतच या पदाधिकाऱ्यांनी खडसे यांना सडेतोड उत्तर दिलं.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मतदार संघातील खडसे यांच्या विरोधातील हे वातावरण पाहता खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत देखील शंका व्यक्त केली जात होती. भाजपाने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे एकीकडे रक्षा खडसे यांच्यावर विजय संपादन करण्याचा दबाव तर दुसरीकडे पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावं लागत आहे.