कॉंग्रेसने देशाला खड्ड्यात घातलं, त्यांनी जाहीरनामा नव्हे, माफीनामा घोषित करावा; CM शिंदेंचे टीकास्त्र
Eknath Shinde On Congress : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतसा प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापल आहे. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. कॉंग्रेसने (Congress) साठ वर्षात देशाला खड्ड्यात घातलं, त्यांनी जाहीरनामा नाही, माफीनामा घोषित करावा, अशी टीका त्यांनी केली.
Rashi Khanna : देसी ते वेस्टर्नपर्यंत राशी खन्नाचा फॅशनेबल अंदाज, पाहा फोटो
आज कोल्हापूर आणि हातकणंगले येथील महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. यावेळी आयोजित सभेला संबोधित करतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आधीचं सरकार फेसबुक लाईव्ह करणारं सरकार होतं. आता सरकार बदललं. आता आपलं महायुतीचं सरकार सत्तेत आलं. आपलं सरकार फेस टु फेस काम करणार सरकारं आहे. रात्रंदिवस काम करणारं सरकार आहे. मी पहाटे उशीरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे उठूनच कामाचा धडाका सुरू करतात. हे चोवीस तास काम करणारं सरकार आहे. हे सरकार घरात बसून काम करत नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Aranmanai 4 गाण्याचा प्रोमो आऊट! तमन्ना- राशी चा दिसला खास अंदाज
पुढं बोलतांना शिंदे म्हणाले, महायुती सरकारने आणि केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. एक रुपयात पिक विमा योजना, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना सहा हजार रुपये, शासन तुमच्या दारी असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलं. पन्नास -साठ वर्षात जे झालं नाहीत, ते मोदींनी दहा वर्षात केलं. आज जाहीरनाम्यात मोदींनी ८० टक्के नागरिकांसाठी सुरू असलेलं रेशनचं वाटप आणखी पाच वर्ष देण्याचं ठरवलं. विमा योजना, आरोग्य उपचार, गरिबांना मोफत वीज, तीन कोटी घरं अशा अनेक घोषणा मोदींना आपल्या जाहीरनाम्यात घोषित केल्या. मोदींचं सरकार हे गोर गरिबांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे, असं शिंदे म्हणाले.
ते म्हणाले, कॉंग्रेसच्या जाहीरनामा हा जाहीरनामा नाही. मुळात त्यांना जाहीरनामा जाहीर करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे. त्यांनी पन्नास- साठ वर्षात देशाला खड्डात घातलं. देशाला अधोगतीकडे नेलं, असं टीकास्त्र शिंदेंनी डागलं.
शिंदे म्हणाले, 2014 आणि 2019 साली विरोधकांचा निवडणुकांत सुपडा साफ झाला. या निवडणुकीतही त्यांची तिच गत होणार आहे. आपण त्यांना पाडायची गरज नाही. तेच एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पाडणार आहेत, अशी टीकाही शिंदेंनी केली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपण आपण सगळे वेगवेगळे लढतो. मात्र, या निवडणूक राष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेऊन आपण एकत्र लढत आहोत. मोदींनी या देशाची अर्थव्यवस्था मजबूतच नाही, तर अकराव्या नंबरवरून पाचव्या क्रमांकावर आणली. आता तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे. मोदींमुळं आज आपल्या देशाला जगात मान-सन्मान मिळतो, असंही शिंदे म्हणाले.