काँग्रेसची स्टार प्रचारकांची जम्बो यादी; कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणींची तोफ महाराष्ट्रात धडाडणार
congress: दलित, अल्पसंख्याक मते खेचण्यासाठी व्यूवरचना काँग्रेस आखात असून, त्यासाठी स्टार प्रचारकांचा भरणा या यादीत आहे.
congress star campaigner for Mahanagarpalika election: नगरपालिका निवडणुकीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या काँग्रेसने महानगरपालिकेसाठी (Mahanagarpalika election) जय्यत तयारी सुरू केलीय. राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. परंतु जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. पण काँग्रेसने (Congress) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय. दलित, अल्पसंख्याक मते खेचण्यासाठी व्यूवरचना काँग्रेस आखात असून, त्यासाठी स्टार प्रचारकांचा भरणा या यादीत आहे. चाळीस प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केलीय. (mahapalika election Congress star campaigner Sachin Pilot, Kanhaiya Kumar, Jignesh Mevani)
अजित पवार तयार असतील तर त्यांना अटीशिवाय मविआत घेऊ; अंकुश काकडेंनी स्पष्टच सांगितलं
स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस खा.मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे.
राहुल कलाटेंच्या प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे बळ वाढले; शतप्रतिशतकडे वाटचाल
कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणीही स्टार प्रचारक
खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम, आमदार भाई जगताप, अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण यांच्याबरोबर कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आ. मुजफ्फर हुसेन, एम.एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.
