Government officers-employee : कर्तव्य बजावत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनेकदा खासगी व्यक्ती आणि संस्थांकडून मारहाण-दमबाजी केली जाते या संदर्भात त्यांना कायदेशीर संरक्षण दिले जाते. यासाठी कलम 353 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. मात्र नुकतचं कर्तव्य बजावत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाण-दमबाजीसंदर्भातील संरक्षण देणाऱ्या विद्यमान कायदेशीर तरतुदींचा फेरविचार करण्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे […]
Nitin Gadkari News : राजकारणात परखत मत व्यक्त करणारे नेते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. मनमोकळा संवाद आणि खास शैलीत विधानांमुळे गडकरी नेहमीच चर्चेत असतात. आत्ताही त्यांनी थेट शरद पवारांविषयी भाष्य करीत सर्वांच्याच भुवया उंचावतील, असं विधान केलं आहे. दरम्यान, नागपूरच्या ग्रामीण भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात गडकरी बोलत होते. […]
K.Chandrashekhar Rao : अनेक महिन्यांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चेंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रातील राजकीय दौरे वाढले आहेत. केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी एक प्रकारे धास्तीच घेतली आहे. केसीआर यांच्या दौऱ्यांवरुन विविध पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या (दि.1) पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गतवेळी आषाढी एकादशीचे औचित्य […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात अल्पवयीन मुलींना शिकवणीच्या नावाखाली एका शिक्षिकेने धर्मांतराकडे ढकलण्याचा धक्कादायक प्रकार केला होता. मुलींना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासोबतच नकार देणाऱ्या मुलींना धमकावलं जात होतं. याप्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी हा मुद्दा थेट विधान परिषदेत उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. यासाठी […]
Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत ठोस कारवाईची मागणी केली. तसेच जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही लव्ह जिहाद अजिबात सहन […]
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येणे या आजाराची लाट आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात डोळे येणे आजाराचे आतापर्यंत 39 हजार 426 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अद्याप या आजाराचा उद्रेक झाला नसला तरीही महापालिकेनेही सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Over 39,000 cases of […]