अहमदनगर : अहमदनगर शहरात महावितरणकडून शनिवारी 4 फेब्रुवारीला महत्त्वाच्या यांत्रिक दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत राहणार आहे. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली. महावितरण कंपनीकडून मुळा धरण परिसरातील फिडर दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी […]
पुणे : कसबा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांची भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह भाजपकडून जोरदार तयारी सुरु असतानाच कुणाल टिळक यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आल्याने चर्चांना उधाण आलंय. कसब्यातून उमेदवारीसाठी अनेकांनी इच्छा दर्शवली आहे. भाजपकडून पुण्यातील एकूण पाच जणांची प्रवक्तेपदी निवड केल्याने कोणाला […]
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. मात्र ही फेर मतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी आल्याचं पाहायाला मिळत आहे. कारण त्यामुळे 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली […]
मुंबई : महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री सत्यजित तांबे यांनी केला आहे. अपक्ष निवडणूक लढवूनही ते भरघोस मतांनी विजयी झाल्याने सत्यजित तांबे यांचं फडणवीसांनी अभिनंदन केलंय. फडणवीस म्हणाले, नाशिक पदवीधरमध्ये महाविकास आघाडीच्या तिनही पक्षांकडून सत्यजित तांबे यांना टार्गेट करण्याच प्रयत्न झाला. तरीही अपक्ष निवडणूक लढवत ते भरघोस मतांनी निवडून […]
अहमदनगर : नाशिक पदवीधरमध्ये ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर आता नवनिर्वचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) कोणती भूमिका घेणार आहेत, याची उत्सुकता लागलेली असतानाच तांबेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. माझी भूमिका उद्या 4 फेब्रुवारीला स्पष्ट करणार असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या विजयानंतर दिलीय. नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सत्यजित तांबे म्हणाले, […]
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार धीरज लिंगाडे 2 हजार 373 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना 41 हजार 27 मते मिळाली आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धिरज लिंगाडे 2378 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रणजित पाटील चौथ्या फेरीतही पिछाडीवर पडले आहेत. चौथ्या फेरीत धिरज लिंगाडे यांना 43340 […]