VIDEO:भटक्या कुत्र्यांच्या समस्यांवरून सभागृह तापले ! महेश लाडंगे म्हणाले, कुत्री प्राणीमित्रांच्या घरी नेऊन सोडा….
Maharashtra Assembly Winter Session : सर्व भटके कुत्री पकडून प्राणीमित्रांच्या घरी पाठविले पाहिजे. चावा घेतल्यावर कळेल, त्यांना काय असते.
Maharashtra Assembly Winter Session Nagpur: भटकी कुत्री, बिबट्यांचा नागरी वस्तीतील वावर, नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात (Assembly Winter Session) उमटले. या प्रश्नांवरील लक्षवेधी सूचनांवरील चर्चेत विरोधकांबरोबर सत्ताधारी आमदारही संतप्त झाले. भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) हे प्राणीमित्र संघटनावर बरसले. सर्व भटके कुत्री पकडून प्राणीमित्रांच्या घरी पाठविले पाहिजे. चावा घेतल्यावर कळेल, त्यांना काय असते, अशी संतप्त भाषा लांडगे यांची होती. तर उबाठाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी तर आमदाराला कुत्रा चावल्यावर करणार असा प्रश्न उपस्थित केलाय.
कष्टकऱ्यांचा आधार बाबा आढाव पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार
भटक्या कुत्र्यांच्या लक्षवेधी सूचनांवर सदस्यांमध्ये जोरदार चर्चा झाली आहे. उबाठाचे सुनील प्रभू म्हणाले, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केलीय. पण ते एसी कॅबिनमधून बाहेर गेले पाहिजे. ते विभागात फिरतील का ? दहा हजार भटक्या कुत्र्यांसाठी एक निवारा केंद्र उभारले जाणार आहे. त्याची मुंबई शहर बाहेर व्यवस्था केली पाहिजे. आमदार गल्लीबोळात फिरतात, लोकांचे प्रश्न एेकतात. समजा आमदार वस्तीत गेला आणि आमदारांना कुत्रा चावल्यावर तुम्ही काय करणार आहात. वस्तीत कुत्रे मागे लागतात. चावल्यामुळे मोठे संकट आहे. रात्री लोक बाहेर पडू शकत नाही. नेमके सरकार काय करणार आहे हे आम्हाला सांगावे, असे प्रभू म्हणाले.
बांगलादेशकडून मर्यादित कांदा आयातीला हिरवा कंदील, देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा
त्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ या उत्तर देताना म्हणाल्या की, राज्यासाठी नोडल अधिकारी नेमला आहे. सर्वस्तरावर शेवटपर्यंत नोडल अधिकारी नेमण्याची तरतूद करणार आहे. सगळ्या आमदारांच्या भावना तीव्र आहात. हा विषय गंभीर आहे. सगळ्या आमदारांची बैठक घेतली जाणार आहे. मंत्र्यांच्या उत्तरानंतर महेश लांडगे यांनी भटक्या कुत्र्यांची समस्या मांडली. ते म्हणाले, मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. त्याच्यावर आक्षेप नाही. पण ही कुत्री वाढली का ? कारण काय आहे ? कुत्री जास्त कुठे असतात. कायद्याचा त्रास नागरिकांना होता, त्याचा विचार होत नाही. प्राणीमित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे. पण कुत्री माणसाला चावतात, त्यांच्यावर प्रेम नाही. जे प्राणीमित्र आहे, त्यांच्याकडे एकाकडे पण कुत्रा नाही. सगळी कुत्री प्राणीमित्रांच्या घरी नेऊन सोडा. त्यांना कळू द्या, कुत्र्यांचा चावा काय असतो तो ?
माझ्या शहरामध्ये 2025 मध्ये आठ हजार लोकांना कुत्री चावली आहेत. पुण्यात तीन वर्षांत एक लाखांहून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा वावर आहे. महिला खरेदीसाठी जातात, तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांचे पथक नेमून भटक्या कुंत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यासाठी राज्यासाठी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांना हा आदेश दिला पाहिजे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केलीय. तसेच प्राणी मित्र संघटनांना बोलून, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, अशी मागणी महेश लांडगे यांनी केलीय.
