फडणवीसांचं गणित चुकलं; नाना पटोलेंचा डाव यशस्वी, शरद पवारांचा प्रभाव कायम

फडणवीसांचं गणित चुकलं; नाना पटोलेंचा डाव यशस्वी, शरद पवारांचा प्रभाव कायम

Maharashtra Lok Sabha Result 2024 :  लोकसभा निवडणुकीचे काल निकाल आले आणि अनेक पक्ष नेतृत्वांच्या प्रभावाचा प्रश्न समोर आला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपकडून आम्ही महायुती म्हणून 45 च्या पुढे जागा जिंकू असा नारा दिला होता. तसंच, भाजपकडून दोन पक्ष फोडण्यात आले. एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. परंतु, सामान्य मतदारांनी हे सगळ नाकारलं हेच या निवडणुकीत समोर आलं आहे. कारण भाजपला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही इतका दारून पराभव झाला आहे. तर एकीकडे काँग्रेस एका जागेवरून 13 जागांवर पोहचत राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ अजित पवारांचा मोठा पराभव झाला असून, शरद पवारांचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे एक समीकरण. सध्यातरी राज्यातील भाजपमध्ये सर्वात ताकदवान नेता कोण तर तो देवेंद्र फडणवीस असं चित्र आहे. प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांचा मोठा प्रभाव विदर्भात आहे. मात्र, विदर्भातीलच नेते नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वात कांग्रेसने जोरदार कमबॅक केलं आहे. त्याचबरोब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतरही मतदारांनी शरद पवारांनाच साथ दिली. त्यामुळे पवारांच महत्व पुन्हा एकदा महत्व अधोरेखीत झालं आहे.

नाना पटोलेंच्या नेतृत्वाला बळ यामध्ये विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे ही सगळे विदर्भातील नेते असताना भाजपचा सुपडासाफ झाला. सुधीर मुनगंटीवार यांना बळच घोड्यावर बसवण चांगलच अंगलट आलं. हक्काची रामटेकची जागा गमावली. अमरावतीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला असतानाही नवनीत राणा यांना पक्षात घेऊन उमेदवारी देणं, अशोक चव्हाणांचा काहीच प्रभाव कुठं पडला नाही. अशा गोष्टी मोठ्या अंगलट आलेल्या दिसतात. तसंच, यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरही मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यावेळी जोरदार चर्चा आहे ती कांग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची. कारण 2019 ला फक्त एका जागेवर यश मिळालेलं असताना पटोलेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेसने चांगली मुसंडी मारली आहे. 1 जागेवरून थेट 13 जागांवर पोहचले आहेत. यामध्ये प्रामुख्याने लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, एकटा चलो चालणार नाही हे लक्षात घेऊन बेरजेच्या राजकारणराला महत्व दिलं. मात्र, काँग्रेस पक्षाने आपल्या मूळ विचारधारेपासून कधीच फारकत घेतली नाही. त्याचा मोठा प्रभाव मतदारांवर दिसला आणि आज एका जागेवरचा पक्ष दोन आकडी संख्येत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झालं आहे.

शरद पवारांचा प्रभाव कायम

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अजित पवारांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. इतकच नाही तर पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. मात्र, या गोष्टींचा मतदारांवर काहीच परिणाम दिसून आला नाही. शरद पवार यांचा प्रभाव कायम दिसून आला आहे. पक्ष फुटला तरी खचून न जाता शरद पवारांनी पुन्हा लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. गेली सहा दशकांच्या आपल्या राजकीय अनुभावाचा कस लावत पवारांनी अनेक नवी गणित मांडली आणि ते यशस्वीही झाले. 10 जागांपैकी थेट आठ जागांवर पवारांना मोठा विजय मिळला आहे. त्यामुळे बारामती आणि महाराष्ट्रात प्रभाव आहे तो शरद पवारांचाच हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube