‘..नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते’; चव्हाणांचं कदमांना तिखट उत्तर

‘..नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते’; चव्हाणांचं कदमांना तिखट उत्तर

Maharashtra Politics : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर दोघांतील वाद आता निवळताना दिसत आहे. मात्र, आता नवा वाद सुरू होईल की काय अशी चिन्हे दिसत आहेत. कारण, मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आता रामदास कदम यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. समाज अंगावर आला तेव्हा अजित पवार यांना डेंग्यू झाला अशी खोचक टीका कदम यांनी केली होती. आता अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार हे रामदास कदमांच्या आकलनाबाहेरचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जेवढ आकलन आहे, तेवढंच वक्तव्य करावं. नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते, असं प्रत्युत्तर सूरज चव्हाण यांनी दिलं. सूरज चव्हाण यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते पुढे म्हणतात, एखाद्या व्यक्तीच्या आजारपणावर बोलू नये. यातून आपले संस्कार दिसतात. पवार कुटुंब किंवा अजित पवार हे आपल्या आकलनाबाहेरचे विषय आहेत. त्यामुळे आपलं जेवढं आकलन आहे तेवढंच आपण वक्तव्य करावं, नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते.

Ramdas Kadam : ‘समाज अंगावर आला अन् डेंग्यू झाला’ अजितदादांच्या दुखण्यावर कदमांचं बोट

काय म्हणाले होते कदम ?

उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले हे आपण समजू शकतो. पण तिथून ते अमित शहांना भेटायला दिल्लीला गेले. मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला अन् नेमका तेव्हाच अजितदादांना डेंग्यू झाला. अजितदादांचे 20 पैकी 20 आमदार शासन आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचं गेट बंद केलं हेच मला कळत नाही.

माझ्या कामावरच किर्तीकर निवडून आले 

1990 मध्ये मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. त्यावेळी मला शिवसेनाप्रमुखांनी खेडमधून तिकीट दिले. केशव भोसले यांच्याबरोबर माझ्याविरोधात दाऊद होता. दाऊदविरोधात निवडणूक लढून मी निवडून आलो. मी खेडमध्ये उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी कांदिवलीत कधी आलो? असा सवाल करत याउलट कांदिवलीत मी केलेल्या कामांवरती किर्तीकर निवडून आले, म्हणजे गजानन किर्तीकर बेईमान आहेत. त्यांना हे शोभत नाही. माझी बदनामी करण्यासाठी खोटी प्रेसनोट काढत आहेत.

Ramdas Kadam : ‘राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंनी माझ्यावर’.. कदमांचा मोठा गौप्यस्फोट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube