VIDE0 : अजित पवारांनी शेवटची सभा गाजवली, पण काकांवर थेट टीका टाळली
Mahayuti Candidate Ajit Pawar Sabha In Baramati : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराचे काही तास शिल्लक आहेत. यंदा बारामतीत काका-पुतण्याची लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार आणि महायुतीचे (Mahayuti) उमेदवार अजित पवार यांच्यात लढत होत आहे. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांची जाहीर सभा बारामती झाली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, आज आपल्या बारामती विधानसभा निवडणुकीच्या सांगता निमित्ताने आपण जमलो आहोत.
बारामतीत सांगता सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, तीन वर्षात नऊ हजार कोटी रूपये निधी आपण बारामती तालुक्याला मिळवून दिलेला आहे. गेल्या 35 वर्षांपासून मला बारामतीकरांनी आशीर्वाद दिलेले आहे. मी काम करताना विचार करायचो. विकास करत आलो, बारामतीकरांचे प्रश्न सोडवत आलो. अनेक प्रकारची विकासाची कामं केली आहेत. ते म्हणाले की मला एक चिठ्ठी आली. त्यात लिहिलेलं होतं की, अजूनही काही घरांना भावनिक करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे सडेतोड उत्तर द्यायला शिका. तुमच्याकडून चूका होवून देऊ नका मी आहे, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी ते म्हणाले की कामं करून घ्या खणखणीत, मतं पण द्या खणखणीत.
खुज नेतृत्व निघालं, रूपया खोटा निघाला…भरणेंना पाडायचं, पाडायचं, पाडायचं; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्हाला पैसे देवून सभेला माणसं आणली नाही. माझ्याही काळात नाही आणि साहेबांच्या काळात देखील नाही. आपल्याला कामं करायचं आहे. तुम्ही कामाच्या मागे उभा राहा. बारामतीमध्ये गुंडागिरी दहशत चालू द्यायची नाही, कोणाचाही लाड करायचा नाही, असं अजित पवार म्हणालेत. ही गावकीभावकीची निवडणूक नाही. ही राज्याचं भविष्य बदलवणारी निवडणूक आहे. तुमच्यामुळे आज राज्यातील दहा नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. यासाठी जनतेला विश्वास द्यावा लागतो, व्हिजन असावं लागतं असं देखील अजित पवार म्हणालेत.
तुमचा पाठिंबा आणि प्रेम याच जोरावर मी महाराष्ट्रात काम करतोय. आता काही म्हणत आहेत की, अजित पवार यांना मत म्हणजे भाजपला मत, पण असं नाहीये. अजित पवारला मत म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मत. भाजपचा पाठिंबा आहे. आम्ही महायुती केली तर तुम्ही महाविकास आघाडी केली. तुम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला. निव्वळ फक्त फसवाफसवीचं राजकारण सुरू असल्याची टीका अजित पवार यांनी केलीय. आचारसंहितेचं तंतोतंत पालन करून आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी केलंय.