महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे….’ पाणी अन् शेतकरी’, दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे….’ पाणी अन् शेतकरी’, दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Dilip Walse Patil Sabha In Landewadi : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे सध्या प्रचाराच्या निमित्ताने गावभेट दौरा करत आहेत. लांडेवाडी गावभेट दौऱ्यादरम्यान बोलताना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 1990 साली ज्यावेळी मी पहिल्यांदा आमदार (Assembly Election 2024) झालो, त्यावेळी शिवाजीराव आणि मी, आम्ही एकत्रच सर्व निर्णय घेत होतो. तीन निवडणुका आम्ही एकत्र लढलो. 2004 साली आढळराव वेगळी भूमिका घेत लोकसभा निवडणुक लढविण्याची भूमिका घेतल्याचं वळसे पाटलांनी भरसभेत सांगितलं.

वळसे पाटील म्हणाले की, आम्ही काही भांडण करून वेगळे झालो नाही, तर एकत्र बसलो विचार विनिमय करून वेगळे झालो. त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून निवडणुक लढवली. ते तीन वेळा खासदार झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा राष्ट्रवादीत आले. माझ्या अपघातामुळे लोकसभेला मला त्यांचा प्रत्यक्ष प्रचार करता आला नाही, तरी मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. मात्र , यावेळची लोकसभेची निवडणूक वेगळी होती. संपूर्ण राज्य आणि देशात वेगळे वातावरण होते. महायुतीला कमी जागा मिळाल्याने महायुती अधिक बळकट झाली. उद्याच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात 100 टक्के महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

…तर मी उमेदवारी मागे घेईल; निकमांच्या बिनबुडाच्या प्रचारावर वळसे पाटलांचं थेट आव्हान

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीत दोन गट झाले, आमदारांची मीटिंग बोलावली होती. या बैठकीला 40 ते 50 आमदार आले होते. त्या सर्वांच्या पुढे महायुतीत जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी 40 आमदार तयार झाले, बाकीचे मागे गेले. मी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय स्वत:च्या स्वार्थासाठी घेतलेला नाही, माझ्यासमोर काही प्रश्न होते, काही समस्या होत्या त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं प्रतिपादन वळसे पाटील यांनी केलंय.

Dilip Walse Patil : आमदारांच्या हालचाली जाणवतात… लवकरच सरकार कोसळणार ?

वळसे पाटील म्हणाले की, डिंभे धरणाच्या पाण्याचा प्रश्न होता, म्हणून मी हा निर्णय घेतला. आज जे लोक मला गद्दार गद्दार म्हणत आहेत, कोण म्हणतंय ईडीची, इन्कम टॅक्सची नोटीस होती. पण माझ्यासामोर वेगळा प्रश्न होता, धरणाचे पाणी वाचवायचे होते. आपले पाणी आणि आपले शेतकरी वाचविण्यासाठी मी ही भूमिका घेतली, असं वक्तव्य वळसे पाटील यांनी लांडेवाडी गावभेट दौऱ्यादरम्यान केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube