‘ओबीसीतूनच आरक्षण घेणार, काय करायचं ते कर’; जरांगेंचं भुजबळांना खुलं चॅलेंज

‘ओबीसीतूनच आरक्षण घेणार, काय करायचं ते कर’; जरांगेंचं भुजबळांना खुलं चॅलेंज

Manoj Jarange Patil : ओबीसी आरक्षणाशिवाय सुट्टी नाहीच, तुला काय करायचं कर, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारला खुलं चॅलेंजच दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी चौथ्या टप्प्यातील आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. जालन्यात मराठा आरक्षणासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. या जाहीर सभेतून मनोज जरांगे मराठा बांधवाना संबोधन केलं. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महाराष्ट्राच्या अलौकिक संत पंरपरेचा इतिहास उलगडणार, ’मुक्ताई’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

मनोज जरांगे पाटील म्हणाले, तू जर मला आणि माझ्या मराठा समाजाला दुश्मन मानलं तर मीही भीत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. तुला काय करायचं ते कर. मराठा समाज ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि सरकार आरक्षण कसं देत नाही तेही मराठे बघणार आहेत. आम्ही दंड आणि मांड्या दोन्ही थोपटल्यात जे व्हायचं ते होऊन जाऊन देत. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला बाथरुमसुद्धा उघडता येणार नसल्याचा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Praful Patel : शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत? प्रफुल पटेलांनी सांगितली इतिहासातील गोष्ट

तसेच वय झालेलं असतानाही, कायद्याच्या पदावर बसून कायदा पायतळी तुडवणारा नेता. इतक्या खालच्या दर्जाचा माणूस आजपर्यंत कधी झाला नाही. राज्यात महापुरुषांच्या जाती काढणारा आत्तापर्यंत एकही व्यक्ती झाला नाही. त्याने महापुरुषांच्या जाती काढल्या. राजद्रोहासारखा प्रकार केला. जाती-जातीत दंगली भडकवण्याचं काम हा माणूस करु लागला आहे. मी जातीवाद कधी करत नाही. मी झोपत नाही तोवर सगळेचं जागे आहेत. मला चष्मे लावून बघत आहेत पण मी कोणालाही भीत नसल्याचं जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं आहे.

मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत. तरीही आरक्षण न देण्याचा काही लोकांनी चंग बांधलायं. 70 वर्षांपासून त्यांनी आरक्षण मिळू दिलं नाही. खायची सवय लागली फुकटचं किती खावं
त्यांना कळाना. त्यांच्या दबावाखाली सरकारने नोंदी लपवल्या होत्या. मराठ्यांच्या पोरांचं नूकसान झालं. त्यांनी मला शत्रू मानायला सुरु केलं. मी काय चूक केली. माझ्या जातीच्या वेदना मांडल्या आहेत, आरक्षणामुळे मराठ्यांच्या लेकरांना त्रास तो मी मांडला. आरक्षण का देत नाहीत हे मी मांडलं. जास्तीचं तू खातोस आमचं आम्हाला दे ही मागणी केली, मी काय चूक केली? असा सवालही जरांगे पाटलांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube