फडणवीसांनी तुम्हाला ठेका दिलायं का? ठाकरेंच्या सवालावर जरांगेंचा प्रतिप्रश्न…
देवेंद्र फडणवीस यांनी आता तुम्हाला ठेका दिलायं का? असा प्रतिप्रश्न मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना केलायं.

Manoj Jarange On Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस यांनी आता तुम्हाला ठेका दिलायं का? असा प्रतिप्रश्न मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलायं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून मनोज जरांगे यांना सवाल केला होता. तुम्हाला लढायचं लढा, पाडायचं पाडा पण आरक्षण कसं देणार हे सांगा? असा सवाल राज ठाकरे यांनी जरांगेंना केला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना प्रतिप्रश्न केलायं.
मनोज जरांगे म्हणाले, आरक्षण कसं देणार हे माझ्या समाजाला माहिती आहे. तुम्हाला ते कळणार नाही, तुम्हाला अस्तित्व कसं संपवायचं हे माहिती आहे, पण अस्तित्व कसं संपू द्यायचं नाही हे मला माहिती असून आरक्षण आणि लढा हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही या भानगडीत पडून मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नका. तुम्ही झोपेत असतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलंय. मला माझा समाज संकटात आणायचा नव्हता, मला लढा टिकवायचा होता. लढायचं की नाही हे मी आणि समाज पाहून घेईन. आम्हाला दुफळी निर्माण होऊ द्यायची नाही. राज ठाकरे यांनी काळजी करण्याची गरज नाही, देवेंद्र फडणवीस यांनी आता राज ठाकरेंकडे ठेका दिलायं का? असा प्रतिसवाल मनोज जरांगे पाटलांनी केलायं.
सत्तेचा गैरवापर दहशत, दमदाटी करणाऱ्यांना घरी बसवा; तनपुरेंचा कर्डिलेंना टोला
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात, आता म्हणतात निवडणूक लढू नंतर म्हणतात पाडणार. तुम्हाला लढवालयचं असेल तर लढवा पाडायचं असेल तर पाडा, प्रश्न एकच आहे की हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहेत हे सांगा. राजकीय पक्ष तुम्हाला तुम्हाला फक्त झुरवताहेत फक्त भुलथापा देताहेत अशा प्रकारचं आरक्षण मळूनच शकत नाही. मी सत्य परिस्थिती मांडतोयं हीच सत्य परिस्थिती जरांगेंना भेटायला गेलो तेव्हा मांडली होती, असं राज ठाकरे म्हणाले होते.