Maratha Reservation : मनोज जरांगेंना मुंबईत यावं लागणार नाही; गिरीश महाजनांनी दिला शब्द

Maratha Reservation : मनोज जरांगेंना मुंबईत यावं लागणार नाही; गिरीश महाजनांनी दिला शब्द

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मुंबईत यावं लागणार नाही, असा शब्दच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला आहे. दरम्यान, येत्या 20 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची पायी दिंडी मुंबईत धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीनंतर गिरीश महाजन बोलत होते.

‘चर्चा तर होणारच! आयराच्या हळदीला रीना दत्ता अन् किरण राव यांच्या मराठमोळ्या लूकनं वेधलं लक्ष!

गिरीश महाजन म्हणाले, समितीच्या बैठकीत जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होतो. मी आत्मविश्वासाने सांगेन की त्यांना मुंबईला यावं लागणार नाही. त्यांना जे अपेक्षित आहे ते मिळालं तर त्यांना यावं लागणार नाही. इकडे मोठ्या संख्येने ते आले तर मोठा गोंधळ होईल, अनेकांचे हाल होतील म्हणून त्यांना जे हवं आहे त्यावर सरकार काम करत असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

शिक्षण MBA पण, मूर्ती कलेतच शोधलं करिअर; मंदिर गर्भगृहासाठी मूर्ती कोरणारे अरुण योगीराज कोण ?

मराठा आरक्षणासंबंधी तांत्रिक बाबी असल्याने थोडासा वेळ लागतो आहे. काही गोष्टी नीट पाहिल्या पाहिजेत. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासंदर्भात चर्चा सुरु असून काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला समजून घ्यावं. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला एवढा मोठं वचन दिलं असून सरकार प्रामाणिकपणे काम करत असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

मनोज जरांगे यांनी सगेसोयरे हा शब्द वापरला आहे, मात्र मुलगी लग्न होऊन घरी गेली तर सासरच्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही. त्यावर देखील तोडगा निघेल. मनोज जरांगेंनी सरकारला मुदतवाढ द्यावी. आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं असून कोर्टात ते टिकायला हवं. कुठलीही घाई करून देण्यात अर्थ नाही. आम्ही आमच्या पद्धतीने सकारात्मक चर्चा करतोय त्यांनीही चर्चा करावी, असंही ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ;
सरकारने जेव्हा ज्या मराठा समाजातील लोकांच्या कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षणामध्ये घेण्याचा आश्वासन दिले मात्र ज्यावेळी मोठ्या प्रमाणात या नोंदी सापडू लागल्या त्यावेळी हा कक्ष बंद करण्यात आला. त्याचबरोबर राजस्थान त्र्यंबकेश्वर इथपासून अनेक ऐतिहासिक नोंदी मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत सापडले आहेत. तर त्याची देखील दखल घेतली जात नाहीये. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर अशा मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमधील मराठ्यांच्या नोंदीचा नोंदणीची दखल घेतली जात नसल्याचं तक्रार यावेळी जरांगे यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube