Maharashtra News : मंत्रीपदासाठी १०० कोटींची लाच प्रकरण, या ‘पाच’ आमदारांना केला होता संपर्क

  • Written By: Published:
Maharashtra News : मंत्रीपदासाठी १०० कोटींची लाच प्रकरण, या ‘पाच’ आमदारांना केला होता संपर्क

मुंबई :  राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यांनतर मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. मुख्य आरोपी रियाझ शेख याच्या CDR तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याप्रकरणी सात लोकांना अटक करण्यात आली होती.

अटक झालेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात आली आणि याच प्रकरणातील मुख्य आरोपीचा CDR काढण्यात आला. या CDR मधून धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये राहुल कुल (Rahul Kul), समाधान अवताडे (Samadhan Aawtade), सुभाष देशमुख (Subhash Deshmukh), सुरेश धस (Suresh Dhas) आणि अतुल सावे (Atul Save) या आमदारांशी मुख्य आरोपीनं संपर्क साधल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : साधा शिवसैनिक, नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांची थक्क करणारी वाटचाल

मुख्य आरोपी रियाझने आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्यानंतर आमदारांनी ही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यानंतर सर्व आमदारांना त्याच्या जाळ्यात पडण्याचं नाटक करून ही माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आमदारांच्या मदतीनं आरोपींना अटक केली होती.

प्रकरण नेमकं काय?

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर काही जणांनी 100 कोटींच्या बदल्यात कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी आमदार राहुल कुल यांनी पोलिसांना कळवून मंत्रिपद मिळवण्याचा दावा करणाऱ्यांना अटक करवून दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube