शेतकऱ्यांबाबत बोलताना जरा जपून; विखेंकडून मंत्री कोकटेंना शाब्दिक सल्ला

Radhakrushna Vikhe Patil : विधानसभा निवडणुकीत जनतेने एवढी मोठी चपराक दिली आहे की उबाठा गट शिल्लक रहातो की नाही याचीच चिंता अधिक आहे.माध्यमा समोर अस्तित्व दाखविण्याचे काम त्यांचे सुरू आहे. कोल्हेकुई करणाऱ्याकडे भाजप लक्ष देत नसल्याची प्रत्युतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना जपूनच वक्तव्य केले पाहीजे.माणिकराव कोकाटे यांच्या मनात तशी भावना नसावी सरकार शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशीलच असल्याचे विखे पाटील म्हणाले.
वक्फ बोर्ड सुधारणेची अनेक वर्षाची मागणी नव्या कायद्यामुळे पूर्ण होणार असून,देशाच्या सामान्य माणसाच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्याच काम केंद्र सरकारने केले असल्याची प्रतिक्रीया विखे पाटील यांनी दिलीयं.
जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर , आई किम फर्नांडिसने घेतला जगाचा निरोप
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की वक्फ बोर्डाच्या माध्यमातून फक्त जमीनी बिल्डर लोकांच्या घशात घालण्याचे काम सुरू होते.हिंदूच्या जमीनी सुध्दा वक्फ बोर्डाकडे हस्तांतर करण्याचे काम सुरू होते. मूठभर मुस्लिमांनी जमीनी बळकावण्याचे काम सुरू होते एकाही मुस्लिमांचा उत्कर्ष वक्फ बोर्डच्या माध्यमातून झाल्याचे उदाहरण नसल्याचे स्पष्ट करून उध्दव ठाकरे गटाने या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना हिंदूत्ववादी म्हणणाच्या कोणताही अधिकार नसल्याचे सांगितले.
जेष्ठ नेते शरद पवार याच्या भूमिकेवर मिश्कील टिपणी करताना विखे पाटील म्हणाले की समाज माध्यामात त्यांच्याबद्दल आलेले एक कार्टून पुरेस बोलक होत प्रसंगी वक्फ बोर्डाचे अध्यक्षपद मिळेल म्हणून ते सभागृहात अनुपस्थित राहीले, असावेत असा खोचक टोला विखे पाटील यांनी लगावला.
शिर्डी विश्वस्त मंडळ नेमणुकीवर भाष्य करताना कायद्यात बसणारे विश्वस्त मंडळ यायला हवे कारण न्यायालयाचे काही निर्देश आहेत.बाबांची शिकवण श्रध्द आणि सबुरीची आहे.संस्थानचा कारभार उतम चालला आहे .बाबांच्या मनात येईल तेव्हा विश्वस्त मंडळ होईल आशी अपेक्षा विखे पाटील यांनी बोलून दाखवली.