तुतारी गटातील 2 गुंडांना कंटाळून खडसेंचा निर्णय; मिटकरींची आव्हाड आणि रोहित पवारांवर टीका

तुतारी गटातील 2 गुंडांना कंटाळून खडसेंचा निर्णय; मिटकरींची आव्हाड आणि रोहित पवारांवर टीका

Amol Mitkari on Rohit  Pawar : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये (BJP) परतणार अससल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता खुद्द खडसेंनी आपण कोणत्याही अटी-शर्तींशिवाय भाजपसोबत जात असल्याचं सांगितलं. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आमदारोहित पवार (Rohit Pawar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जोरदार टीका केली.

Saqib Saleem: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या साकिब सलीमबद्दलच्या या खास गोष्टी 

तुतारी गटातील दोन गुंडांना कंटाळून नाथाभाऊंनी कठोर निर्णय घेतल्याची टीका मिटकरींनी केली.

मिटकरी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून खडसे दबावात होते, अस्वस्थ होते. त्यांना ईडी, सीबीआयकचा धाक त्यांना दाखवण्यात आला, असं बातम्यांमध्येही जरी सांगण्यात येतं असलं तरी मी चॅलेंज देऊन सांगतो की, तुतारी गटातील बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या त्रासाला कंटाळून नाथाभाऊंनी हा कठोर निर्णय घेतल्याचं मिटकरी म्हणाले.

Sunder Kokanraj Song : गारवा फेम गायक मिलिंद इंगळेचं नवं गाणं पाहिलंत? 

या दोन गुंडागर्दीमुळं करणाऱ्या नेत्यांमुळे पक्ष फुटला आणि आता ते पक्ष संपण्याच्या तयारीत आहेत, असा आरोपही मिटकरींनी केला. नाथाभाऊ जर आज असा निर्णय घेऊन स्वगृही जात असतील तर ईडी, सीबीआय किंवा तश्या गोष्टींचा धाक आहे, असं म्हणता येणार नाही. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दोन गुंडांनी गुंडागर्दी करून एकनाथ खडसेंना पक्षाबाहेर काढलं, असं मिटकरी म्हणाले.

विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आता ते अजित पवार गटाचा प्रचार करताना दिसत आहेत. याबाबत विचारले असता मिटकीर म्हणाले की, महायुतीमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. विजय शिवतारे यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांच्या तोडीस तोड उत्तर आम्ही देखील दिलं. त्यानंतर अनेकांनी त्यांची समजूत काढली. आता 11 तारखेला सासवडला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. या ठिकाणी विजय शिवतारे किंवा हर्षवर्धन पाटील असतील. त्यांना यांना समन्वयाच्या भूमिकेतून महायुतीने आदेश दिले. ते आदेशाचं उल्लंघन करणार नाीत, असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube