आणखी एका काकांविरोधात शड्डू; अजितदादांच्या गटातील आमदाराचा पुतण्या ठाकरे गटात

आणखी एका काकांविरोधात शड्डू; अजितदादांच्या गटातील आमदाराचा पुतण्या ठाकरे गटात

तळेगाव : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचे पुतणे शैलेश मोहिते (Shailesh Mohite) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे. तळेगावमध्ये त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात हाती शिवबंधन बांधले. शैलेश मोहिते यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये (NCP) राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. 2021 मध्ये आमदार मोहिते यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याच्या आरोपांनंतर शैलेश मोहिते यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. (MLA Dilip Mohite’s nephew Shailesh Mohite joined the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) faction)

Sanjay Raut : फडणवीसांकडे अयोध्या आंदोलनातील फोटो… राऊत म्हणाले “ते तिथे फिरायला गेले असतील”

शैलेश मोहिते हे कधीकाळी दिलीप मोहिते यांचे उजवे हात मानले जात होते. दोघांनी मिळून खेड तालुक्यात 2004 ते 2014 पर्यंत सत्ता गाजवली. पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालये येथे शैलेश यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यावेळी ते युवक काँग्रेसमध्येही सक्रीय होते. मात्र 2014 च्या निवडणुकीत दिलीप मोहिते यांचा पराभव झाला, या पराभवाला शैलेश यांचे वागणे जबाबदार असल्याचेही म्हटले गेले.

Rohit Pawar : ‘जरांगे पाटलांची भूमिका योग्यच, सरकार झोपले होते का?’ रोहित पवारांचा रोखठोक सवाल

त्यानंतर दोघांच्या भांडणाला सुरुवात झाली. 2021 उजाडताना ही भांडणे एवढी वाढली की स्वतःच्या काकांनाच हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी कट रचल्याचा शैलेश मोहिते यांच्यावर आरोप झाला. या ट्रॅपसाठी जी महिला निवडली होती तिनेच ही माहिती दिलीप मोहिते यांच्या जवळच्या दुसऱ्या पुतण्याला सांगितल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर साताऱ्यात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र या गुन्ह्यातून न्यायालयातून जामीन मिळताच याच महिलेने शैलेश यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता शैलेश मोहिते यांनी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube