मराठा आरक्षण आंदोलनाला आपचा पाठिंबा; संजय सिंह म्हणाले ‘कुणबी, मराठा समाजाच्या समस्या गंभीर…

मराठा आरक्षण आंदोलनाला आपचा पाठिंबा; संजय सिंह म्हणाले ‘कुणबी, मराठा समाजाच्या समस्या गंभीर…

MP Sanjay Singh meet Manoj Jarange Patil Maratha Reservation protest Mumbai : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलनासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत दाखल झाले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवित मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात भेट घेतली. मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj)आरक्षणाच्या मागणीला आम आदमी पक्षाचे समर्थन असल्याचे खासदार संजय सिंह यांनी यावेळी सांगितले.

Breaking! मराठा आरक्षणसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला जवळपास ठरला, जरांगेंसमोर मांडला जाणार?

काय म्हणाले खासदार संजय सिंह

आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) यांनी मनोज जरांगे यांची आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यादेखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना खासदार संजय सिंह म्हणाले की, “देशामध्ये तामिळनाडू राज्याचे एक उदाहरण असे आहे जिथे आरक्षणाची एकूण टक्केवारी वाढविण्यात आली आहे. ही जबाबदारी सरकारची आहे की, कोणाच्या हिताला धक्का न लावताही मराठा समाजाची आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत त्यांना पूर्ण केले पाहिजे. आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. हे करण्यात सरकारला कोणती समस्या आहे”. असे खासदार संजय सिंह यांनी यावेळी म्हटले.

धक्कादायक! तब्बल 11 टक्के भारतीय ‘या’ आजाराच्या उंबरठ्यावर; सवयी बदला अन् सेफ व्हा

कुणबी, मराठा समाजाच्या समस्या गंभीर

आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) यांनी ‘या आंदोलनाची इतर आंदोलनांशी कशी तुलना करता’? या प्रश्वावर सांगितले की, “वेगवेगळ्या विषयांवर आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलनं केली जातात. मराठा आंदोलन आता देशाचं आंदोलन बनलं आहे. महाराष्ट्रातलं हे आंदोलन पूर्ण देशात पोहोचलं आहे. कारण कुणबी समाज, मराठा समाज (Manoj Jarange Patil) यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या गंभीर आहेत आणि चिंतेचा विषय आहेत”.

मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा कट, आंदोलनात समाजकंटकांची घुसखोरी; सकल मराठा समाजाचा आरोप

मराठा समाजाच्या मागणीला समर्थन

पुढे बोलताना खासदार संजय सिंह म्हणाले की, “शेतकऱ्याला त्यांच्या पिकाचा पूर्ण मोबदला दिला जात नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. जर त्यांना नोकरी, शिक्षणात आरक्षण मिळत नाहीये तर या प्रश्नावर ते उपोषण, आंदोलन, मोर्चे, सभा यांद्वारे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवत आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, अरविंद केजरीवालजी, आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्रातील आमचे पदाधिकारी मराठा समाजाच्या (Manoj Jarange Patil) मागणीला समर्थन देतो आणि आम्ही मराठा समाजाच्यासोबत आहोत”. असे आश्वासनही त्यांनी (MP Sanjay Singh) यावेळी दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube